BJP : लोकसभेसाठी भाजपचा असा आहे मुख्य अजेंडा ; देशभर दहा लाख..

Lok Sabha Elections 2024 BJP Agenda News : . भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरविण्यात आली.
Amit Shah, J.P. Nadda, Narendra Modi
Amit Shah, J.P. Nadda, Narendra ModiSarkarnama

Lok Sabha Elections 2024 BJP Agenda News : भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांची उच्चस्तरीय बैठक काल (रविवारी) पक्षाच्या मुख्यालयात झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बुथस्तरावर काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा, यावेळी घेण्यात आला.

"आगामी लोकसभा निवडणुका जिंकायच्या असेल तर स्थानिक निवडणूक बुथ अधिक मजबूत कसे करता येईल, याकडे विशेष लक्ष द्या," असे नड्डा यांनी यावेळी सांगितले. वर्षभरात सहा राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.यात पक्षाची काय तयारी आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

"देशभर भाजपचे दहा हजार निवडणूक बुथ असतील," असे नड्डा यांनी सांगितले. मार्चमध्ये भाजपच्या दोन लाख केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकविण्यात येणार आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरविण्यात आली.

येत्या निवडणुकीत देशभर भाजपची सत्ता येईल, यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. केंद्र सरकारच्या जनकल्याण योजनेचा लाभ जनतेला मिळत आहे, की नाही याचा आढाला जेपी नड्डा यांनी या बैठकीत घेतला.

Amit Shah, J.P. Nadda, Narendra Modi
Maharashtra Budget Session 2023 : आजपासून सुरु होणारे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं : विरोधकांची रणनीती..

एक कोटी सेल्फीचं टार्गेट

भाजप महिला मोर्चाकडून सरकारच्या कल्याणकारी योजना महिलापर्यंत पोहचविण्यासाठी आजपासून (सोमवार) अभियान सुरु करण्यात आले आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी या महिलांच्या संपर्कात राहून त्याच्यासोबत सेल्फी घेणार आहेत. वर्षभरात एक कोटी सेल्फीचं टार्गेट त्यांना देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com