Bihar By-Election : बिहारचा सामना बरोबरीत; पण भाजपचे मताधिक्य घटले

Bihar By-Election : बिहारमध्ये दोन जागांवर पोट निवडणूक झाली. यामध्ये आरजेडी आणि भाजपने एक-एक जागा जिंकली
Rjd, Bjp
Rjd, Bjpsarkarnama

Bihar By-Election : देशातील 6 राज्यांतील सात जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या सात विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर आज याचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये बिहारमधील (Bihar) 2 आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, ओडिशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तर हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे आणि ओडिशातील धामनगर जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे. देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोकामामध्ये आरजेडी आणि अंधेरीच्या जागेवर उद्धव गटाने बाजी मारली आहे.

Rjd, Bjp
Nana Patole : `भारत जोडो` यात्रा म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढाच..

बिहारमधील गोपालगंज, उत्तर प्रदेशमधील गोला गोकरनाथ आणि हरियाणातील आदमपूरमध्ये भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. तेलंगणातील मुनुगोडेमध्ये टीआरएस ने विजय मिळवला आहे. तर ओडिशातील धामनगर जागेवर भाजपने विजय मिळवला आहे.

बिहारमधील दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. बिहारमधील गोपालगंज येथील पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. यावेळी गोपालगंज जागेवर भाजपच्या उमेदवार कुसुम देवी यांनी आरजेडीच्या मोहन प्रसाद यांचा पराभव केला. बिहारच्या पोटनिवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि आरजेडीमध्येच (Rjd) असल्याचे मानले जात होते.

गोपालगंजमध्ये एकूण 50.83 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये महिलांचे मतदान 52.45 टक्के, तर 49.25 टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. बिहारमधील मोकामा जागेवरही पोटनिवडणूक झाली. जिथे राजदने पुन्हा कब्जा केला आहे. बाहुबली नेते अनंत सिंह यांची पत्नी नीलम देवी या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

Rjd, Bjp
तेलंगणात टीआरएसने भाजपला चारली धूळ; केसीआर यांनी गड राखला

गोपालगंजमध्ये आम्ही 2020 मध्ये 40 हजार मतांच्या फरकाने हरलो होतो. यावेळी आम्ही केवळ 1 हजार 794 मतांनी पराभूत झालो. त्यातही भाजपला सहानुभूती होती. आम्ही भाजपच्या मूळ मतांमध्ये घट केली आहे. पुढच्या वेळी आम्ही 20 हजार मतांनी आघाडी घेऊ, असे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com