सिसोदियांना भाजपची ऑफर? : ‘आप' तोडून भाजपमध्ये या, तपास- चौकशांचा फेरा संपवा!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने नुकतीच झाडाझडती केली होती.
Manish Sisodia
Manish Sisodiasarkarnama

AAP Vs BJP : दिल्लीतील अबकारी धोरण व नवीन दारू धोरणातील कथित भ्रष्टाचाराविरूध्द आम आदमी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने नुकतीच झाडाझडती केली होती. याच सिसोदिया यांना भाजपकडून ‘`आप तोडून भाजपमध्ये या, तुमच्यावरील सारे खटले संपतील'' असा संदेश आल्याच्या चर्चेने आज खळबळ उडाली. सिसोदिया यांनीच ट्विट करून आपल्याला भाजपने ही ‘आॅफर' दिल्याचे सांगितले. भाजपने यावर थेट काही न बोलता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सिसोदिया यांनी, आपल्याला भाजपने आॅफर दिल्याचे सांगतानाच आपण भाजपचा हा प्रस्ताव धुडकावल्याचेही त्याच ट्विटमध्ये स्पष्ट केले. ‘‘मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. कोणी माझा शिरच्छेद केला तरी मी भ्रष्टाचारी व कटकारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्याविरूध्दचे सारे खटले खोटे आहेत. (तुम्हाला) जे करायचे ते करून घ्या." अशी गर्जना सिसोदिया यांनी केली. त्यावर पलटवार करताना भाजप खासदार प्रवेश साहेबसिंह वर्मा म्हणाले, की महाराणा प्रताप यांच्या नावाने सिसोदिया यांनी राजकारण करू नये. जातीधर्माच्या राजकारणाला भाजप थारा देत नाही.

Manish Sisodia
अबकारी धोरण अंगलट आले अन् मनिष सिसोदिया सीबीआयच्या जाळ्यात अडकले

तुम्ही घोटाळ्यात अडकताच जातीचे कार्ड खेळण्यास सुरवात केली हे दिल्लीकर पहात आहेत. महाराणा प्रताप यांचे वंशज दारू विक्रीतून भ्रष्टाचार करत नाहीत हे सिसोदिया यांनी लक्षात ठेवावे.

दरम्यान दिल्लीतील पटपडगंज या मध्यम-उच्चमध्यमवर्गीयांची बहुसंख्या असलेल्या भागाचे आमदार असलेले सिसोदिया यांना पटपडगंज, लक्ष्मीनगर मयूर विहार, प्रीत विहार या परिसरांत त्यांना पाठिंब्याचे फलक लागले आहेत. आगामी गणेशोत्सव या भागांतही दणक्यात साजरा होतो त्यावरही सिसोदिया यांची चौकशी व त्यांची संभाव्य धरपकड यांचे पडसाद उमटणे अपरिहार्य मानले जाते.

Manish Sisodia
CBI Raid : सिसोदिया यांची पंधरा तास चौकशी ; लॅपटॅाप, मोबाईल जप्त

सिसोदिया यांनी भाजपकडून आपल्याला ऑफर आल्याचे सांगितले. त्यावर कोणी ही ऑफर दिली हे जाहीर करा असे प्रतीआव्हान भाजपमधून देण्यात आले. सिसोदिया यांच्यावरून आप वर ह्ललाबोल करताना भाजप नेत्यांनी सांगितले की आपचा भ्रष्टाचार व दिल्लीकर जनतेच्या कोट्यवधी रूपयांची नासाडी जगजाहीर होत आहे. ज्यांचे विचार इतके छोटे आहेत अशा लोकांना तोडण्याचे भाजपकडून का प्रयत्न होतील असा सावल करून पक्षनेते गौरव भाटीया म्हणाले की आप नेतृत्वा (केजरीवाल) खरेच देशातील सर्वांत प्रामाणिक नेते असतील तर त्यांनी, नवीन अबकारी धोरण का आणले व त्यात भ्रष्टाचार झाला नव्हता तर 9 महिन्यांत ते रद्द का केले ? या भाजपच्या प्रश्नावर केडरीवाल गप्प का बसले आहेत ? त्यांनी यावर उत्तर न देणे हीच आपच्या भ्रष्ट्चाराची कबुली होय.

बकारी धोरणाबाबत तज्ज्ञांच्या समितीने उपराज्यपालांना ज्या शिफारसी केल्या होत्या त्याच्या बरोबर उलट धोरण केजरीवाल-सिसोदिया यांनी आणले. पहिल्याच फटक्यात 144 कोटींचा घओटाळा झाला. याला जबाबदार आप नव्हे तर कोण आहे ? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही केजरीवाल यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याबद्दल त्यांना पुन्हा घेतले.

Manish Sisodia
`आप`च्या अडचणी वाढल्या; सिसोदिया यांना कधीही होऊ शकते अटक!

‘तेलंगणा‘ वरही निशाणा ?

दिल्लीतील वादग्रस्त अबकारी धोरण ठरविण्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग होता असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. दक्षिणेत कर्नाटक पाठोपाठ तेलंगणावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी कालच हैदराबादमध्ये जाऊन लोकप्रिय तेलगू अभिनेते ज्युनियर एनटीआर यांचा पाठिंबा मिळविला. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांना ‘दिल्ली‘च्या मार्गानेही घेरण्याचे भाजपचे डावपेच आहेत. केजरीवाल-सिसोदिया सरकारने वादग्रस्त दारू धोरणासाठी ज्या बैठका घेतल्या त्यात केसीआर यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. दिल्लीतील दारू धोरणावर तेलंगणातील दारू धोरणाचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे असा आरोप खासदार वर्मा यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com