राकेश टिकैत यांच्यावर हल्ला ; दोन संघटना भिडल्या, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

शेतकऱ्यांच्या दोन संघटनेतील कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने या ठिकाणी काही काळ तणाव होता.
rakesh tikait)
rakesh tikait)ani
Published on
Updated on

बेंगलुरु (कर्नाटक) : शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान संघटनेचे (bhartiya kisan union) नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज बेंगलुरु (bengaluru) येथे दुपारी घडली. पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तींने अचानकपणे राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याने गोंधळ उडाला. यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. (rakesh tikait latest news)

राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी संबधीत व्यक्तीला पकडले. दरम्यान त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याने राडा झाला.

स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थंकाने टिकैत यांच्यावर शाई फेकली, असा आरोप टिकैत यांच्या समर्थकांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या दोन संघटनेतील कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने या ठिकाणी काही काळ तणाव होता.

rakesh tikait)
राज्यसभेसाठी मी पात्र नाहीये का ? ; नगमांचा सोनियांना सवाल, धुसफुस चव्हाट्यावर

या घटनेनंतर टिकैत यांना स्थानिक पोलिसांनी कुठलीही सुरक्षा पुरवली नाही. यावरुन टिकैत यांनी सरकारवर टिका केली. "भाजप सरकारच्या सांगण्यावरुन माझ्यावर हा हल्ला करण्यात आला," असा आरोप टिकैत यांनी केला आहे.

वर्षभरापूर्वी राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर राजस्थान येथे हल्ला झाल्याची घटना घडली होती. राजस्थानमध्ये काही लोकांच्या गटाने हा हल्ला केला होता. टिकैत अलवरमधील हरसौरामध्ये एका सभेला संबोधित केल्यानंतर बानसूरला जात होते. यावेळी ततारपूरमध्ये घोळक्याने टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरु केली.

rakesh tikait)
जग हादरलं : पुतीन यांचा मृत्यू ? ; तोतया सांभाळतोय रशियाचा कारभार

या हल्ल्यामध्ये राकेश टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. या दरम्यान काही लोकांनी टिकैत यांच्यावर शाई फेकली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्यांना घटनास्थळावरुन दूर नेले होते. पोलिसांच्या सुरक्षेत राकेश टिकैत यांना बानसूर येथे पोहोचवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com