मेक्सिको सिटी : जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे. ब्रिटनमध्ये (UK) यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी अखेर माफी मागण्याची वेळ जॉन्सन यांच्यावर आली आहे.
पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेल आता समोर आला होता. जॉन्सन यांच्या सुमारे 100 मित्र आणि सहकाऱ्यांना ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तुमची दारू तुम्हीच आणा, असे म्हटले होते. ही पार्टी पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटवरील गार्डनमध्ये झाली होती. विशेष म्हणजे देशात लॉकडाऊन असताना ही पार्टी झाली होती. ही पार्टी 2020 च्या नाताळमध्ये झाली होती. त्यावेळी देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे डाऊनिंग स्ट्रीटवर सातत्याने होणाऱ्या पार्ट्या चर्चेत आल्या आहेत.
या प्रकरणी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत होते. याबाबत अखेर जॉन्सन यांनी देशाची माफी मागितली आहे. जॉन्सन यांनी संसदेत माफीनामा सादर करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला सगळ्यांची माफी मागायची आहे. काही गोष्ट चुकीच्या पद्धतीने झाल्या. मी याची जबाबदारी घेतो.
जॉन्सन आणि त्यांची प्रेयसी केरी यांनी ही पार्टी दिली होती. या पार्टीला 40 जण उपस्थित होते. ही पार्टी डिसेंबर 20202 मध्ये झाली होती. नेमके त्याचवेळी देशात लॉकडाऊन होते. देशातील शाळा, पब आणि रेस्टॉरन्ट बंद करण्यात आली होती. ही माहिती समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला असून, जॉन्सन यांच्यावर टीका होत आहे. सामान्य नागरिक त्रासात असताना पंतप्रधान अशा प्रकारे पार्टी कसे करू शकतात, असाही प्रश्न विचारला जात आहे.
जॉन्सन यांनी 2019 मध्ये देशात झालेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. आता त्यांनी केलेल्या पार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने ते अडचणीत आले आहेत. देशात लॉकडाऊन असताना ते पार्टी करीत होते आणि मित्र व सहकाऱ्यांसमवेत हास्यविनोदात रमले होते, असा व्हिडीओही समोर आला आहे. मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर यांनी यावरून जॉन्सन यांच्यावर हल्लाबोल केला होता. देशाचे नेतृत्व करण्याची नैतिकता जॉन्सन यांनी गमावली आहे, असे त्यांनी म्हटले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.