रशियन सैनिकांकडून युक्रेनियन मुलींवर पाशवी अत्याचार; खासदाराने शेअर केले फोटो

Russia-Ukraine war| रशियन सैनिक युक्रेनमध्ये लुटमार करत आहेत, मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या करत आहेत.
Russia-Ukraine war
Russia-Ukraine war
Published on
Updated on

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून रशिया युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine war) सुरु आहे. या युद्धात युक्रेनचे (Ukraine) मोठे नुकसान झाले असून युद्धातील अनेक घटनाही समोर येत आहेत. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यादरम्यान युक्रेनच्या खासदाराने गंभीर आरोप केला आहे. रशियन सैनिक युक्रेनच्या महिला, मुलींवर बलात्कार (Rape) करुन त्यांची हत्या करत असल्याचा आरोप रशियन खासदार लेसिया वासिलेंक यांनी केला.

याबाबत त्यांनी ट्विटवर काही फोटोही शेअर केले आहेत. रशियन सैनिक युक्रेनियन मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या करत असल्याचा दावा लेसिया वासिलेंक यांनी केला आहे. त्यांच्या मृतदेहावर स्वस्तिकच्या जळालेल्या खुणा आढळून आल्या आहेत. रशियन सैनिक 10 वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करत आहेत. लुटमार आणि हत्या करत असल्याचा दावाही लेंसिया वासिलेंक (Lesia Vasylenk) यांनी केला आहे.

Russia-Ukraine war
लोकसभेत गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयकाला मंजूरी

लेसिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'रशियन सैनिक युक्रेनमध्ये लुटमार करत आहेत, मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या करत आहेत. अगदी 10 वर्षांच्या मुलींसोबतही हे घडत आहे. महिलांच्या अंगावर स्वस्तिकच्या आकाराच्या जळालेल्या खुणा आढळून आल्या आहेत. हे सर्व रशियन सैनिक करत आहेत. रशियन मातांनी त्यांना वाढवले ​​आहे. अनैतिक गुन्हेगारांचा देश.’ असे म्हणत त्यांनी रशियन सैनिकांवर आरोप केले आहेत.

धक्कादायक म्हणजे आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी जाळल्याच्या खुणाचे छायाचित्र शेअर करत लिहिले, ‘महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे, शरीरावर अत्याचाराच्या खुणा आहेत. माझ्याकडे शब्द नाहीत. राग, भीती आणि द्वेषामुळे माझे मन काम करत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

लेगिया वासिलेंक या युक्रेनच्या लिबरल होलोस पक्षाच्या नेत्या आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून युक्रेनमधील विध्वसांच्या अनेक घटना समोर येत आहेत. रशियाने युक्रेनमधील बूचा शहरात केलेल्या विध्वंस आणि नरसंहाराच्या घटनांमुळे सध्या जगातील सर्व देश रशियावर संतापले आहेत. येथे 300 हून अधिक सामान्य लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कबर खोदून अत्याचार करून मारण्यात आलेल्या लोकांचे मृतदेह सर्वत्र सापडत आहेत.

बुचा शहर पूर्वी रशियन सैनिकांच्या ताब्यात होते, रशियन सैनिकांनी बूचा शहर सोडल्यानंतर युक्रेनियन सैन्य शहरात आल्यानंतर त्यांना हे भयानक दृश्य पहायला मिळाले. हे ठिकाण राजधानी कीव पासून जवळ आहे. रशियन सैनिक नागरिकांवर अत्याचार करत आहेत, त्यांची हत्या करत आहेत आणि महिलांवर बलात्कार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com