Armstrong Death : तामिळनाडू बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या; काय आहे कारण?

Chennai BSP : आर्मस्ट्राँग यांच्या हत्येनंतर चेन्नईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी बसपाच्या कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
K Armstrong
K ArmstrongSarkarnama

Tamilnadu Politics : तामिळनाडूतील बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची शुक्रवारी (ता. 5) हत्या करण्यात आली.

चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर ते आपल्या काही कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

चाकू आणि तलवारीने हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यात आर्मस्ट्राँग गंभीर जखमी झाले होते. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आर्मस्ट्राँग यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे.

आर्मस्ट्राँग यांच्या हत्येनंतर चेन्नईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी बसपाच्या कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मस्ट्राँगवर हल्ला करणाऱ्या सहा हल्लेखोरांपैकी चार जणांनी फूड डिलिव्हरी कंपनीचे टी-शर्ट घातले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सूडाच्या भावनेतून ही हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली. हत्येमध्ये सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत.

K Armstrong
Manoj Jarane : 'या' एका शब्दानं सरकारची तंतरली; मनोज जरांगेंनी सांगितला किस्सा

आर्मस्ट्राँग यांची 2006 मध्ये त्यांची चेन्नई कॉर्पोरेशन कौन्सिलवर निवड झाली. 2007 मध्ये त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. 2011 मध्ये त्यांनी तामिळनाडूमधील कोलाथूर मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, पराभव पत्करावा लागला. दोन वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये मेगा रॅली आयोजित केल्यानंतर आर्मस्ट्राँग प्रकाश झोतात आले होते. त्या रॅलीत त्यांनी बसपा प्रमुख मायावती यांना बोलावले होते.

आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi आणि राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आर्मस्ट्राँगची निर्घृण हत्या ही निंदनीय घटना आहे. ते वकील होते आणि तामिळनाडूतील दलितांसाठी एक मजबूत आवाज होते. राज्य सरकारने दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

K Armstrong
Manoj Jarange Rally : शांतता रॅलीत पहिलाच वार छगन भुजबळांवर; मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com