Mayawati: मोठी बातमी ! मायावतींचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत आकाश आनंद ?

BSP Mayawati : मायावतींनी आपला उत्तराधिकारी ठरवला, भविष्यात आकाश आनंद यांच्याकडे पक्षाची कमान असणार...
Mayawati
Mayawati Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मोठी घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे. मायावतींनी आपला उत्तराधिकारी ठरवला असून मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद हे मायावतींचे उत्तराधिकारी असणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

पक्षाच्या एका बैठकीत मायावतींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आकाश आनंद यांनी 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mayawati
Dhule News: अजितदादा गट-भाजप नेत्यांमध्ये श्रेयवादावरून चढाओढ; नगरसेवक-सत्ताधारी भिडले..

गेल्या काही दिवसांपासून मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असेल यासंदर्भात राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यापुढे आकाश आनंद यांच्याकडे भविष्यात पक्षाची कमान असणार आहे.

'बसपा'च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मायावती यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच याच बैठकीत मोठी घोषणाही केली. भविष्यात पक्षाची कमान आकाश आनंद याच्याकडे असेल, असे जाहीर केले.

कोण आहेत आकाश आनंद ?

मायावतींनी आपला उत्तराधिकारी ठरवत पुतण्या आकाश आनंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आकाश आनंद नेमकं कोण आहेत, असा प्रश्ना अनेकांना पडला आहे. तर आकाश आनंद हे मायावतींचे पुतणे असून त्यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच 2017 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. आकाश हे सध्या 'बसपा'चे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहतात.

(Edited by-Ganesh Thombare)

Mayawati
Raut Attack Modi-Shah : भाजप ही राजकीय पार्टी नसून मोदी- शाह यांची टोळी; संजय राऊतांचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com