मायावती बनणार राष्ट्रपती? सतीशचंद्र मिश्रांनी घेतली थेट योगींची भेट

मायावतींना राष्ट्रपतिपदाची ऑफर असल्याची चर्चा
Satish Chandra Mishra and Mayawati
Satish Chandra Mishra and Mayawati Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांना राष्ट्रपतिपदाची ऑफर असल्याची चर्चा सुरू आहे. यातच मायावतींचे विश्वासू सहकारी सतीशचंद्र मिश्रा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर अखेर मायावती यांनीच खुलासा केली आहे. राष्ट्रपती नव्हे तर पंतप्रधानपदालाच महत्व देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बसपचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आणि पक्षाचे एकमेव आमदार उमाशंकरसिंह यांनी योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पुन्हा एकदा मायावतींच्या राष्ट्रपतिपदाची चर्चा सुरू झाली आहे. अखिलेश यादव यांनी यानंतर मायावतींवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत बसपने आपली मते भाजपकडे वळवली, यामुळं त्यांना आता भाजप राष्ट्रपती बनवते की नाही हे पाहावे लागेल, असे अखिलेश यादवांनी म्हटलं आहे.

Satish Chandra Mishra and Mayawati
तर राज्यात पाच वर्षे पेट्रोल, डिझेल करमुक्त! मुख्यमंत्र्यांचं थेट मोदींना आव्हान

यावर मायावतींनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे अफवा पसरवत आहेत, असा आरोप करून मायावती म्हणाल्या की, समाजवादी पक्षाने मला राष्ट्रपती बनवण्याच स्वप्न विसरून जावं. मी राष्ट्रपती झाल्यास राज्यातील सत्तेत ते येतील, असे त्यांना वाटत आहे. मी कधीही राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहिलेले नाही. कारण मला आरामाचे नव्हे तर संघर्षाचे आयुष्य हवे आहे. उत्तर प्रदेशचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे तसेच, देशाची पंतप्रधान बनण्याचे माझे स्वप्न आहे.

Satish Chandra Mishra and Mayawati
पेट्रोल, डिझेल कुणामुळं महाग? मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी सरकारला आकडेच दाखवले

मी मुख्यमंत्री असताना माझ्या कार्यकाळात बनवलेल्या स्मारकांकडे आधी समाजवादी पक्षाने आता भाजप सरकारने दुर्लक्ष केले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मिश्रांच्या नेतृत्वाखाली बसपच्या शिष्टमंडळाने योगींची भेट घेतली. राज्यात मुस्लिम आणि इतरांवर होत असलेल्या अत्याचारांना समाजवादी पक्षच जबाबदार आहे, असेही मायावती म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com