Budget 2023 Live : इन्कम टॅक्सची स्लॅब ७ लाखांवर

Union Budget 2023 : रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
 nirmala sitharaman
nirmala sitharamanSarkarnama

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी सकाळी 11 वाजता 5व्यांदा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. हा देशाचा 75वा अर्थसंकल्प आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी दिली आहे.

कोरोना महामारीच्या काळात भारतात १०२ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविड आणि युद्ध यांच्या पार्श्वभूमवीरही अर्थव्यवस्था स्थिर आहे. कोरोना काळात थेट लाभार्थीच्या खात्यात मदतीची रक्कम देण्यात आली. युपीआय आणि कोविन अॅपमुळे जगभरात भारताचे महत्व वाढले- निर्मला सीतारामन

मच्छिमारासाठी विशेष पॅकेज, त्यांच्यासाठी सहा हजार कोटींचा निधी उभारण्यात येणार आहे.

लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी 2014 पासून सरकारचे प्रयत्न आहेत. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून 1.97 लाख झाले आहे. जग भारताकडे लखलखत्या ताऱ्याप्रमाणे पाहत आहे. जागतिक मंदीतही आमचा विकास दर 7% राहिला आहे. इतर देशांपेक्षा मजबूत.

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी योजना राबवणार. शिक्षकांना उत्तरोत्तर शिक्षण मिळत राहील यादृष्टीने योजना राबवल्या जातील.

लहान मुलं आणि शाळकरी मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन करणार, भुगोल, गणितासह अनेक पुस्तके उपलब्ध होणार-निर्मला सीतारामन

कोणताही पीक घेण्याकरता शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, कषीपुरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. पीएम मत्स्य संपदा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ हजार कोटी निधीची तरदूत, मासेमाऱ्यांना मदत करणार.

अमृतकाळाचे ध्येय तंत्रज्ञानावर आधारित आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे आहे. यासाठी सरकारी निधी आणि आर्थिक क्षेत्राची मदत घेतली जाईल. यासाठी 'लोकसहभाग', 'सबका साथ, सबका प्रयास' आवश्यक आहे.

अर्थसंकल्पाचे सात आधार (सप्तर्षी)

1. सर्वसमावेशक वाढ, 2. वंचितांना प्राधान्य, 3. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, 4. क्षमता विस्तार, 5. हरित वाढ, 6. युवा शक्ती, 7. आर्थिक क्षेत्र.

 nirmala sitharaman
nirmala sitharaman

पायाभूत सेवेसाठी ७५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मॅनहोलची सफाई ही मशिनव्दारेच करणार असे सीतारमण यांनी सांगितले.

डिजिटलच्या इंडियाला साजेशी केवायसी पद्धत सोपी करण्यात येणार आहे. डिजि लॉकर, आधार माध्यमातून माहिती एकत्रिकरण करणार

आर्टिकफिशिअल इंटेलिसन्स हे भविष्य आहे, त्यासाठी भारतातच संशोधन होणार असून सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून एआयची इकोसिस्टम तयार करणार, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे.

कृषी क्षेत्रात स्टार्टअपला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी युवा कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडची स्थापना करण्यात येणार आहे.

आपला जिल्हा आपलं उत्पादन

शहरी भागातील लोकांना संधी मिळावी, सुविधा मिळावी याकरता शहरांना आणि राज्यांना प्रोत्साहन देणार आहे. शहरी पायाभूत सुविधा निधी तयार केला जाणार, नॅशनल हाऊसिंग फायनान्स कमिटीकडून हा फंड मॅनेज केला जाणार आहे, शहर स्तरावरील संस्था या निधीचा वापर करून विकासाच्या योजना राबवू शकतील यासाठी 'आपला जिल्हा आपलं उत्पादन'

गोवर्धन योजेनेसाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे. देशात २०० बाँयोगँस प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० कौशल्य भारत केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम तयार करून विद्यार्थ्यांना थेट मदत देण्यात येणार आहे. 5G वरील संशोधनासाठी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये 100 लॅब उभारण्यात येणार आहे.

मोबाईल, इलेक्ट्रीक कार, कॅमेरा, लेन्स, खेळणी स्वस्त होणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. तर चांदीचे दागिने महाग होणार आहेत. (Budget 2023 Live ) सिगारेट, विदेशी किचन चिमणी, सोन, प्लॅटियम चांदीचे दागिने महागणार

इन्कम टॅक्सची स्लॅब ७ लाखावर करण्याची मोठी घोषणा सीतारमण यांनी केली आहे. 9 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला ४५ हजार रुपये टॅक्स भरावा लागेल. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही टॅक्स लागणार नाही. इन्कम टॅक्सचे स्लॅबही घटवण्यात आले आहेत. ते आता 6 वरून 5 करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com