Budget 2023 News : डिजीटल व्यवहारात मोठी वाढ : तब्बल 1.24 लाख कोटींची UPI देवाण-घेवाण; सीतारामन म्हणतात...

Enhancement In Digital Payments : UPI-आधारित व्यवहारात 121 टक्के आणि त्याच्या मूल्यांमध्ये 115 टक्के वाढली.
Budget 2023 News : Nirmala Sitaraman
Budget 2023 News : Nirmala SitaramanSarkarnama

Union Budget News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज संसदेत 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील डिजिटल आर्थिक व्यवहारात वाढ झाल्याचे त्यांनी संसदेत सांगितले आहे. डिजिटल व्यवहारांच्या उल्लेखनीय वाढीमुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे त्यांनी दावा केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा बहुप्रतिक्षित अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली की, 2022 मध्ये UPI व्यवहार 1.24 लाख कोटींपर्यंत वाढले आहेत. सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, "हा अर्थसंकल्प मागील काळात रचलेल्या पायावर उभारी घेईल."

Budget 2023 News : Nirmala Sitaraman
Budget 2023 News : कोरोनाकाळात एकही जण उपाशी राहिला नाही, 80 करोड गरिबांना धान्य : सीतारमण यांचा दावा!

मंगळवारी (दि.३१ जाने) मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण (2022-23) च्या पार्श्वभूमीवर, ज्यात नमूद केले आहे की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला अलिकडच्या वर्षांत मोठी चालना मिळाली आहे, ज्यामुळे मूल्यांमध्ये वाढ झाली आहे.

सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, 2019 आणि 2022 दरम्यान, UPI-आधारित व्यवहारात 121 टक्के आणि त्याच्या मूल्यांमध्ये 115 टक्के वाढले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित केलेली, 11 एप्रिल 2016 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रथम रिअल-टाइम पेमेंट सेवा सुरू केली होती.

Budget 2023 News : Nirmala Sitaraman
Budget 2023 News : कोणत्या मंत्रालयाला किती निधी? 'संरक्षण' पहिल्या क्रमांकावर, तर 'रेल्वे' तिसऱ्या स्थानी!

डिजिटल सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत, सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, अनेक सरकारी योजनांनी देशाच्या बाजारपेठेचा कायापालट केला आहे, ज्यामुळे नागरिकांना अनेक क्षेत्रांमधील सेवांमध्ये प्रवेश व वाढ करता आली आहे. या योजनांमध्ये MyScheme, TrEDS, GEM, e-NAM आणि UMANG सारख्या योजनांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com