Assembly by-elections : सात राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर; मतदान 'या' दिवशी होणार

Assembly by-elections in seven states : जाणून, कोणत्या सात राज्यांमध्ये होणार निवडणूक आणि कधी जाहीर होणार निकाल?
Assembly by-elections
Assembly by-electionsSarkarnama

Election Commission News : लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि नरेद्र मोदी यांनी कालच पंतप्रधान पदाची शपथ घेत आपला तिसरा कार्यकाळ सुरु केला. तोच आता निवडणूक आयोगाने आणखी एका निवडणुकीची घोषणा केली आहे.

यानुसार आता देशातील सात राज्यांमधील एकूण 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व जागांवर 10 जुलै रोजी मतदान होईल. तर या निवडणुकीचा निकाल 13 जुलै रोजी घोषित होईल. निवडणूक आयोगानुसार तामिळनाडू -1, मध्य प्रदेश -1, उत्तराखंड - 2, पंजाब - 1, हिमाचल - 3, बिहार - 1 आणि बंगालमधील चार जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

Assembly by-elections
Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींचं 'Social Engineering' ; मंत्रिमंडळात असा साधला समन्वय!

या जागांची अधिसूचना 14 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जून निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 24 जून रोजी होणार आहे. यानंतर मतदान 10 जुलै रोजी होणार आहे आणि निकाल 13 जुलै रोजी असणार आहे.

Assembly by-elections
Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी ; वाचा फक्त एकाच क्लिकवर!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर 71 जणांनाही मंत्रिपदाची शपथ दिली गेली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींसह सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात यासाठी भव्य शपथविधी सोहळा आयोजित केला गेला होता.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री(स्वतंत्र पदभार) आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण 31 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असून, पाच राज्यमंत्री(स्वतंत्र पदभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com