Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींचं 'Social Engineering' ; मंत्रिमंडळात असा साधला समन्वय!

Narendra Modi Oath Ceremony : मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण 31 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असून, पाच राज्यमंत्री(स्वतंत्र पदभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
PM Modi
PM ModiSarkarnama

PM Modi Swearing-in Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर 71 जणांनाही मंत्रिपदाची शपथ दिली गेली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींसह सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात यासाठी भव्य असा शपथविधी सोहळा आयोजित केला गेला होता.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री(स्वतंत्र पदभार) आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण 31 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असून, पाच राज्यमंत्री(स्वतंत्र पदभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

PM Modi
Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी ; वाचा फक्त एकाच क्लिकवर!

मोदींना आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिमंडळाची निवड करताना जातीय समीकरणाचाही विचार केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 21 सवर्ण, 27 ओबीसी, 10 दलित, 5 आदिवासी आणि 5 अल्पसंख्याकांचा समावेश आहे. पाहूयात मोदींनी निवडलेले कोणते मंत्री कोणत्या वर्गगारीत मोडतात.

सवर्ण-

अमित शाह, नितीन गडकरी, पीयूष गोयल, एस जयशंकर, मनसुख मांडविया, राजनाथ सिंह, जितिन प्रसाद, जयंत चौधरी, धर्मेंद्र प्रधान, रवनीत बिट्टू, नितीन गडकरी, पीयूष गोयल, मनोहर लाल खट्टर, जितेंद्र सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, राम मोहन सेठू, सुकांत मजुमदार, प्रल्हाद जोशी, जेपी नड्डा, गिरीराज सिंग, लालन सिंग, सतीशचंद्र दुबे.

PM Modi
Narendra Modi Cabinet : मोदी 3.0 सरकार; 'या' 30 कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा यादी

ओबीसी-

सीआर पाटील, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, बीएल वर्मा, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, राव इंद्रजित सिंग, कृष्णपाल गुर्जर, भूपेंद्र यादव, भगीरथ चौधरी, अन्नपूर्णा देवी, शोभा कुमारस्वामी, एचडी कुमारस्वामी. नित्यानंद राय.

दलित-

एसपी बघेल, कमलेश पासवान, अजय टम्टा, रामदास आठवले, वीरेंद्र कुमार, सावित्री ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, चिराग पासवान, जीतन राम मांझी, रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे.

आदिवासी-

जुआल ओरम, श्रीपाद येसो नाईक, सर्बानंद सोनोवाल यांचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com