BJP News : महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून हटवलेल्या भाजप नेत्याला लागणार प्रदेशाध्यक्षपदाची लॉटरी!

संघ परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला संधी मिळावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपेक्षा आहे.
C. T. Ravi
C. T. Ravi Sarkarnama
Published on
Updated on

karnataka News : महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घेण्यात आलेले सी. टी. रवी यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदावरूनही डच्चू देण्यात आलेला आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कट्टर हिंदुत्ववादी असलेले रवी यांच्या गळ्यात कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. (C. T. Ravi will be the president of Karnataka BJP)

भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात सी. टी. रवी (C.T. Ravi) यांना पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून बाजूला करण्यात आले आहे. तसेच, गोवा आणि महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे रवी यांचे पक्षात डिमोशन सुरू आहे का, अशी चर्चा रंगली होती.

C. T. Ravi
Congress MLA Will Split? : काँग्रेस आमदार अस्वस्थ, महाआघाडीतून फुटून भाजपत प्रवेश करणार; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा कर्नाटकच्या पक्षसंघटनेबाबत चर्चा केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक (Karnataka) भाजपचे विद्यमान अध्यक्ष नलिनकुमार पाटील यांचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे ते लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू होता. तो आता सी. टी रवी यांच्यामुळे संपल्याचे बोलले जात आहे. रवीही प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी इच्छूक आहेत.

C. T. Ravi
Madha Loksabha : भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी; दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संघ परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला संधी मिळावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपेक्षा आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेले रवी यांच्याकडे नवे प्रदेशाध्यक्ष पाहिले जात आहे.

C. T. Ravi
Maharashtra Politic's : काँग्रेस-भाजपला मिळणार नवे प्रभारी; रवींना वगळले, तर पाटलांचा भार कमी करण्याचा निर्णय

दरम्यान, सी. टी. रवी हे चिक्कमंगळूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. भाजपच्या मागील सरकारमध्ये रवी हे कॅबिनेट मंत्री हेाते. मात्र, राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच, रवी यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे प्रभारीपदही होते. मात्र, विधानसभेच्या २०२३ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपतून काँग्रेसमध्ये गेलेले थम्मय्या यांनी त्यांचा पराभव केला होता. असे असले तरी त्यांच्या गळ्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com