Cast Census in Bihar: जातनिहाय जनगणना होणार; बिहार सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Bihar Govt : जातनिहाय जनगणना करण्याचा बिहार सरकारचा मार्ग मोकळा
Nitish Kumar and Tejashwi Yadav
Nitish Kumar and Tejashwi Yadav Sarkarnama
Published on
Updated on

Bihar News: बिहार सरकारच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या विरोधातील सर्व याचिका पाटणा हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे जातनिहाय जनगणना होण्याचा मार्ग मोकळा झाला असून बिहार सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

जातनिहाय जनगणना करण्याच्या विरोधात पाटणा हायकोर्टात सहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला 4 मे रोजी पटणा हायकोर्टाने स्थगिती दिली होती. तसेच सरकारने जमा केलेला डेटा सुरक्षित ठेवायलाही न्यायालयाने सांगितलं होतं.

Nitish Kumar and Tejashwi Yadav
PM Modi visit In Pune News : पवारांनी पंतप्रधान पदाचा मान राखला, अन् कौतुक टाळत आघाडी धर्मही पाळला..

यानंतर या प्रकरणासंदर्भात जुलै महिन्यात सलग सुनावणी पार पडली. जनगणनेसंदर्भांत 80 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बिहार सरकारने कोर्टात सादर केली. अखेर मंगळवारी हायकोर्टाने सरकारला दिलासा देत याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या.

Nitish Kumar and Tejashwi Yadav
PM Narendra Modi Speech: महाराष्ट्राचा विकास म्हणजेच भारताचा विकास; पंतप्रधान मोदींनी फुंकले निवडणुकींचे रणशिंग

बिहारमधील ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका बिहार सरकारने घेतली असून हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला.

"भाजप म्हणत असेल हा आमचा विजय आहे, तर मग देशभर जातनिहाय जनगणना करा. केंद्रात तुमची सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही जातनिहाय जनगणना करू शकता. भाजपचा हा खेळ सगळ्यांना समजला असून हा गठबंधन सरकारचा विजय आहे", असे उपमुख्यमंत्री यादव म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com