Jagdish Tytler : शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधात CBIचे आरोपपत्र ; नवा पुरावा दाखल

CBI filed charge sheet against jagdish tytler : नवा पुरावा सीबीआयने दाखल केला असल्याचे समजते.
CBI|
CBI|Sarkarnama

CBI filed charge sheet against jagdish tytler : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधात शनिवारी आरोपपत्र दाखल केले आहे. (cbi filed charge sheet against jagdish tytler in 1984 anti sikh riots in delhi)

इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीतील एका ठिकाणी आग लागून यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दिल्लीसह देशभरात शिख समाजाच्या विरोधात दंगली झाल्या होत्या. याप्रकरणात काँग्रेसचे नेता जगदीश टायटलर, सज्जन कुमार आणि एचकेएल भगत यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाल्यानंतर उत्तरेतील अनेक राज्यात हिंसाचार उसळला होता. दिल्लीतही शीखबहुल भागात दंगल उसळली. याप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर दोषारोप ठेवून त्यांची चौकशी सुरू आहे. चार दशकानंतर टायटलर यांची चौकशी सुरु आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जगदीश टायटलर यांच्या आवाजाचे नमुने घेतले.

दिल्लीमधील पुल बंगश या भागात १९८४ साली शीखविरोधी दंगल उसळून तीन लोकांचा खून झाला होता, या प्रकरणात जगदीश टायटलर यांच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याचा तपास केला जाणार आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात हा ताजा पुरावा असेल ज्या माध्यमातून ३९ वर्षांपूर्वी टायटलर यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचा माग काढता येईल.

यात जगदीश टायटलर यांनी १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत आजाद मैदान परिसरात जमलेल्या गर्दीला उद्देशून भाषण केलं होते. यानंतर झालेल्या हिंसाचारात ठाकुर सिंह, बादल सिंह, गुरु चरण सिंह यांचा मृत्यू झाला होता. सकाळी नऊ ते अकरा वाजेदरम्यान झालेल्या हा हिंसाचार जगदीश टायटलर यांच्यासमोर झाला होता, याबाबतचा नवा पुरावा सीबीआयने दाखल केला असल्याचे समजते.

CBI|
RBI withdraw Rs 2,000 Note : नोटबंदीवर अजित पवार म्हणाले.."महिलांकडे पैसे ठेवलेले असतात.. ; ..आधी त्या नोटा बदलून घ्या !

याप्रकरणात जगदीश टायटलर हे आरोप आहेत, त्यांच्याविरोधात अजून काही पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यावर दोन जून रोजी सुनावणी होणार आहे.

एक नोव्हेंबर रोजी आपण सकाळी ७ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आपण तीन मूर्ती भवनात होतो, असा दावा जगदीश टायटलर यांनी केला आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरच्या व्यवस्थेत देखभाल करीत होतो, असे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com