नीरव मोदीलाही टाकलं मागं; पठ्ठ्यानं केला पंधरा हजार कोटींचा घोटाळा

नीरव मोदी व मेहूल चोक्सीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा आहे.
Sanjay Bhati
Sanjay Bhati
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची (PNB) तब्बल दहा हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या नीरव मोदीपेक्षा (Nirav Modi) मोठा घोटाळा समोर आला आहे. मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बाईक बोट (Nirav Modi) घोटाळ्यामध्ये तब्बल 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नीरव मोदी व मेहूल चोक्सीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा आहे.

सीबीआयने बाईक बोट घोटाळ्याप्रकरणी (Bike Bot Scam) गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील बाईक बोट कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी (Sanjay Bhati) यांच्यासह चौदा जणांना आरोपी करण्यात आले आहे. कंपनीने देशभरातील गुंतवणूकदारांची पंधरा हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नीरव मोदी व मेहूल चोक्सी यांनी पंजाब बँकेला सुमारे दहा हजार कोटी रुपयांना फसवले आहे.

Sanjay Bhati
सोमय्यांनी दिवाळीआधीच अचानक का पेटवली फटाक्यांची वात?

बाईक बोट कंपनीने गुंतवणुकीसाठी बाईक-टॅक्सी नावाची योजना आणली होती. त्यामध्ये ग्राहकांना एक, तीन, पाच किंवा सात बाईकसाठी पैसे गुंतवता येणार होते. या बाईकची देखभाल व चालवण्याची जबाबदारी कंपनीवर होती. ग्राहकांना महिन्याला त्याचे भाडे, हप्ते व बोनस दिला जात होता. या आकर्षक योजनांचे अमिष दाखवून ग्राहकांना जोडले जात होते. नोव्हेंबर 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

ग्राहकांकडून या योजनेत एका व्यक्तीकडून 62 हजार 200 रुपये गुंतवणूक स्वरूपात घेण्यात आले. या बदल्यात कंपनीने वर्षभर ग्राहकांना 9 हजार 765 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण तसे काहीच झाले नाही. गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन कंपनीचे संचालक फरार झाले. लाखो लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. हा घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनेही तपास सुरू केला होता. ईडीने 216 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Sanjay Bhati
गुंडे प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंची एन्ट्री; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

कंपनीच्या योजनेत सुमारे दोन लाखांहून अधिक ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. भाटी व त्यांच्या सहकाऱ्यांचे हे पूर्वनियोजन षडयंत्र होते. त्यांनी यातून सुमारे 15 हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असे सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा असल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com