CBSE Rechecking Result Shock : CBSEच्या फेरतपासणीत मोठा धक्का! 94% वरून थेट 100%, विद्यार्थिनी देशात ठरली टॉपर

CBSE rechecking creates huge controversy as Jharkhand student jumps from 94% marks to perfect 500/500 after answer sheet re-evaluation : झारखंडमधील विद्यार्थिनी अवनी केजरीवाल हिला सुरुवातीला 94 टक्के गुण होते. परंतु फेरतपासणीनंतर तिचे गुण थेट 500 पैकी 500 इतके निघाले आहेत.
CBSE Rechecking Result Shock
CBSE Rechecking Result ShockSarkarnama
Published on
Updated on

CBSE Class 12 Result 2026 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत एक धक्कादायक आणि तितकाच चर्चेचा विषय ठरलेला प्रकार समोर आला आहे.

झारखंडमधील रांची इथल्या विद्यार्थिनी अवनी केजरीवाल हिला सुरुवातीला 94 टक्के गुण देण्यात आले होते. मात्र फेरतपासणीनंतर तिचे गुण थेट 500 पैकी 500 इतके निघाले असून ती आता देशातील अव्वल विद्यार्थिनी ठरली आहे.

CBSE बारावी परीक्षेचा निकाल 13 मे 2026 रोजी जाहीर झाला होता. निकालानंतर अवनीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची शंका आली. त्यामुळे तिने अधिकृत प्रक्रियेनुसार गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी अर्ज केला.

यानंतर CBSE कडून उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या आणि संपूर्ण पुनर्मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेनंतर जाहीर झालेल्या सुधारित निकालात मोठा बदल दिसून आला. अवनीचे (School Student) गुण थेट 94 टक्क्यांवरून 100 टक्क्यांवर पोहोचले आणि तिला सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले.

अवनीने यंदा वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. ती रांची येथील दिल्ली पब्लिक स्कूल रांची विद्यार्थिनी आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे केवळ झारखंडच नव्हे तर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अवनीच्या यशाचं कौतुक

शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. जया चौहान यांनी अवनीच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, 500 पैकी 500 गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर अव्वल येणे ही आमच्या शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल.

साडेचार लाख विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकांची मागणी

दरम्यान, CBSE ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी तब्बल 4 लाख 4 हजार 319 अर्जांद्वारे 11 लाख 31 हजार 961 उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतींची मागणी केली होती.

उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीचा उच्चांक

याशिवाय 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जवळपास 3 लाख 80 हजार उत्तरपत्रिकांच्या गुणपडताळणी आणि फेरतपासणीसाठी अर्ज केले होते. अवनी केजरीवालचे प्रकरण समोर आल्यानंतर आता CBSE च्या मूल्यमापन प्रक्रियेवरही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com