दिल्ली : भारताचे दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची (CDS Bipin Rawat Helicopter crash) चौकशी पुर्ण झाली आहे. त्रि-सेवा समितीला या दुर्घटनेची चौकशी आणि तपास करुन अहवाल तयार करण्याचा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समितीने चौकशी अहवाल तयार केला. सध्या हा अहवाल कायदेशीर सल्ल्यासाठी विधी शाखेकडे पाठवला आहे. लवकरच तो वायुसेनेच्या हातात दिला जाणार आहे.
सध्या या अहवालाला वायुसेनेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी समितीला अपघाताचे (CDS Bipin Rawat Helicopter crash) प्राथमिक कारण खराब हवामान आढळले आहे. खराब हवामानामुळेच पायलट 'डिसओरियंट' झाले असावेत आणि त्यामुळे हा अपघात घडला अशा निष्कर्षाचा उल्लेख या अहवालात नमुद करण्यात आला आहे. तांत्रिक भाषेत या गोष्टीला सीएफआयटी म्हणजे 'कंट्रोल्ड फ्लाइट इंटू टेरेन' असे म्हटले जाते.
चौकशी समितीने चौकशी करतेवेळी वायुसेना आणि लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. यासोबतच समितीने या अपघातावेळी (CDS Bipin Rawat Helicopter crash) प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक लोकांशीही चर्चा केली. तसेच अपघातापूर्वी ज्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करण्यात आला होता त्याची ही समितीने चौकशी केली आहे. या समितीने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा एफडीआर म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्सही जप्त केला होता. त्याचा डेटाही या अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.
CDS बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला गत महिन्यातील ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी अपघात झाला होता. ते व्हीआयपी हेलिकॉप्टरने कोईंबतूरहून दिल्लीला निघाले होते. मात्र तमिळनाडूतील कुन्नूरजवळ पोहचल्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. या अपघातात रावत (Bipin Rawat) त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.