नोकरदारांसाठी खूषखबर; सरकारनं दिलं मोठं दिवाळी गिफ्ट

लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
Hike in DA
Hike in DA
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA) तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरूवारी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुमारे 47 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

गुरूवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत चर्चा झाली. भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यावर एकमत झाल्याचे समजते. याबाबतचा निर्णय लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 31 टक्के होणार आहे. यावर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाने या भत्त्यामध्ये 11 टक्के वाढ केली होती. त्यावेळी हा भत्ता 28 टक्क्यांवर पोहचला होता. आता त्यात तीन टक्क्यांची भर पडली आहे.

Hike in DA
भाजपला मोठा धक्का; रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद

महागाई भत्ता पुर्वलक्षी प्रभावाने 1 जुलै 2021 पासून लागू केला जाण्याची शक्यता आहे. वेतन आणि पेंशनच्या सध्याच्या 28 टक्के दरावर 3 टक्क्यांची अतिरिक्त वाढ मिळले. सुमारे 47 लाख 14 हजार कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेंशनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयामुले केंद्र सरकारच्या तिजोरीवर 9 हजार 488 कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.

दरम्यान, जुलै महिन्यात केंद्र सरकारने डीएमध्ये वाढ केल्यानंतर अनेक राज्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारनेही नुकतंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्याने लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com