
सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ लवकरच मिळणार आहे, अशातच त्यांच्यासाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये मोठे बदल केले आहेत.
त्यानुसार आता कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा काढून टाकल्यास त्याला निवृत्तीचा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारची बडतर्फी किंवा हकालपट्टीच्या निर्णय संबंधित प्रशासकीय विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) सुधारणा नियम, २०२५ नुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU employees) रुजू झाल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ किंवा काढून टाकले असल्यास त्याला सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार नाही, हा नियम २२ मे पासून लागू करण्यात आला आहे. पूर्वीच्या नियमांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा सेवेतून काढून टाकले असले तरी सेवानिवृत्तीचे लाभ मिळत होता.
केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 नुसार रेल्वे कर्मचारी, नैमित्तिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती आणि आयएएस, आयपीएस आणि आयएफओचे अधिकारी वगळता 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना हा नियम लागू आहे.
जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती.हा आयोग लागू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. केंद्र सरकारचे कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. जवळपास १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. २०२६ पर्यंत आठवा वेतन लागू केला जाऊ शकतो.आतापर्यंत दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो.
सहावा वेतन आयोग हा २०६ रोजी लागू करण्यात आला होता.
२०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला.
आता २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.
७ व्या वेतन आयोगाबाबत घोषणा ही २०१४ रोजी घोषणा केली होती.
त्यानंतर दोन वर्षांनी हा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला होता.
सातव्या वेतन आयोगाचा कालावधी हा १० वर्षांचा आहे.
हा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे.
जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होईल.
हा वेतन आयोग कधी लागू केला जाईल याबाबत घोषणा झालेली नाही.
मिडिया रिपोर्टनुसार, आठवा वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टर २.२८ वरुन २.८६ पर्यंत वाढू शकतो.
जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जो १८००० रुपये आहे त्यांचा पगार ५१,४८० रुपये होऊ शकते.
कर्मचाऱ्यांच्या पगारात १८६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.