Champai Soren: चंपई सोरेन यांचा भाजप प्रवेशाचा सस्पेंस संपला; शहांच्या भेटीनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Champai Soren to Join BJP on Friday: झारखंडचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते चंपई सोरेन यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. ते 30 ऑगस्ट रोजी रांची येथील कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार आहेत, असे हेमंत बिस्मा सरमा यांनी म्हटलं आहे.
Champai Soren to Join BJP
Champai Soren to Join BJP Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन (champai soren) यांचा भाजप प्रवेशाबाबतचा सस्पेंस संपला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांची तारीख ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच चंपई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. पण आता नवा पक्ष स्थापन न करता ते भाजपमध्ये प्रवेश करून पुढची निवडणुक लढवणार आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्मा सरमा यांनी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोरेन यांनी सोमवारी भेट घेतली. बैठकीत 30 ऑगस्ट रोजी रांची येथे चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ठरले आहे. हेमंत बिस्मा सरमा या बैठकीस उपस्थित होते. त्याचा फोटो त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशामुळे झारखंडमध्ये नवी राजकीय समीकरणे तयार होताना दिसत आहेत. चंपाई सोरेनच्या माध्यमातून भाजपचा आदिवासी व्होटबँकेवर डोळा असल्याचे दिसते. चंपाई सोरेन यांच्यामुळेच झारखंड मुक्ती मोर्चा पुढे सरसावला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाला विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. पक्षाने चंपाई यांना मुख्यमंत्रीपदी ठेवायला हवे होते. भविष्यात ते जे काही पाऊल उचलतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे काही आदिवासी नेत्यांचे म्हणणे आहे.

Champai Soren to Join BJP
Dr. Anjali Ghadge: केज मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’त आणखी एका इच्छुकाची भर; डॉ. अंजली घाडगेंचा प्रवेश

"चंपाईवर अन्याय झाला आहे. त्याचा अपमान करण्यात आला. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून जबरदस्तीने हटवण्यात आले," असे आदिवासींचे म्हणणं आहे. हेमंत सोरेन हे जेलमध्ये गेल्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री आणि पक्षाची धुरा सांभाळली होती. हेमंत सोरेन जेलमधून बाहेर येताच त्यांना राजीनामा द्यावा लागला. ते नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com