Chhattisgarh Election Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह उपमुख्यमंत्री, मंत्रीही पराभूत..

Chhattisgarh Election News : छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिपक बैज यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
Chhattisgarh Election Result
Chhattisgarh Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Election News : छत्तीसगडची सत्ता काँग्रेस पुन्हा राखणार असा दावा त्यांच्या नेत्यांकडून केला जात होता. परंतु आजच्या मतमोजणीनंतर तो किती फोल होता हे स्पष्ट झाले आहे. (Chhattisgarh Election Result) भाजपने ५४ जांगावर आघाडी घेत बहुमतासह सत्तेकडे आगेकूच केली आहे. काँग्रेसचा पराभव एवढा मोठा आहे की ज्या नेते आणि मंत्र्यांच्या जीवावर पक्षाने भाजपला आव्हान दिले होते ते राज्याचे उपमख्यमंत्री, मंत्री आणि प्रदेशाध्यक्षच पराभूत झाले.

Chhattisgarh Election Result
Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला `पनौती`, नऊ मंत्री पिछाडीवर...

काँग्रेस (Congress) विरोधात राज्यात किती नाराजी होती हे यावरून स्पष्ट होते. कुठल्याही पक्षासाठी त्या राज्याचा प्रदेशाध्यक्ष हा प्रमुख नेता असतो. उमेदवार निवडीपासून ते रणनिती आखण्यापर्यंतच्या प्रवासात प्रदेशाध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची समजली जाते. (Bjp) पक्षाला विजय मिळाला तर त्याचे श्रेय पक्षाचा राज्याचा प्रमुख म्हणून सर्वप्रथम त्याला दिले जाते. पराभव झाला तर त्याचे खापरही त्याच्यावरच फोडले जाते.

छत्तीसगडचे (Chhattisgarh) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिपक बैज यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. चित्रकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विनायक गोयल यांनी त्यांना 8740 मतांनी पराभव केला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांच्या मंत्रीमंडळात उपमख्यमंत्री राहिलेले टीएस सिंहदेव हे ही पराभूत झाले आहेत. त्यांच्या पराभवाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी ते अंबिकापुर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला आहे. काँग्रेससाठी हा दुहेरी झटका मानला जातो. याशिवाय काँग्रेसचे अनेक मंत्री हे आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर होते. उपमुख्यमंत्री पराभूत झाले असतांना बाघेल मंत्रीमंडळातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री राहिलेले अमरजीत भगत यांचाही सीतापूर विधानसभा मतदारसंघातून दारूण पराभव झाला आहे. भाजप उमेदवार राजकुमार टोप्पो यांनी त्यांचा 20978 मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे पक्षाच्या रायपूर येथील प्रदेश कार्यालयाबाहेर शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे. सध्या भाजप 90 पैकी 54 जांगावर आघाडीवर आहे. यातील बहुतांश मतदारसंघात भाजपने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम असल्याने छत्तीसगडमध्ये त्यांना बहुमत मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात दुसऱ्यांदा सत्ता येईल असा दावा आणि विजयाच्या जल्लोषाची तयारी केलेल्या काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दुपारीच प्रदेश कार्यालयातून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com