Chhattisgarh Election Result
Chhattisgarh Election ResultSarkarnama

Chhattisgarh Election Result : छत्तीसगडमध्ये भाजपचे हर हर ` महादेव`...

Chhattisgarh Election News : पैसे जप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री संतापले आहेत, असे म्हणत मोदींनी थेट बघेल यांचे नाव या प्रकरणाशी जोडले होते.
Published on

Chhattisgarh Election News : छत्तीसगडची सत्ता भाजपने काँग्रेसकडून खेचून आणली असे म्हणावे इतपत जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 46 जागांचा टप्पा भाजपने पार केला आहे. सध्या 52 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. (Chhattisgarh Election Result) भाजपच्या या विजयात मोदींची गॅरंटी, काँग्रेसने विद्यमान 22 उमेदवारांची कापलेली उमेदवारी हे मुद्दे प्रामुख्याने महत्त्वाचे ठरत आहेत. याशिवाय ऐन निवडणूक काळात काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर `महादेव` आॅनलाइन गेमिंग अॅपच्या माध्यमातून झालेल्या आरोपांचाही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Chhattisgarh Election Result
Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये `त्या` बावीस आमदारांनी काँग्रेसला दाखवला `हात`...

या प्रकरणात बघेल पुरते फसले आणि भाजपने याचा पुरेपूर फायदा निवडणूक प्रचारात उचलला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले होते. काही दिवसांपूर्वी महादेव बुक बेटिंग अ‍ॅप प्रकरणी चित्रपट अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावले होते. तेव्हापासून या प्रकरणाची चर्चा देशभरात सुरू झाली होती. पुढे याची कडी थेट छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यापर्यंत पोहाेचली होती.

निवडणूक प्रचारात भाजपने याच मुद्द्यावरून काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर छत्तीसगडमध्ये एका जाहीर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी महादेव बुक बेटिंग अ‍ॅपवरून भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला होता. काँग्रेसने महादेव हे नाव सोडले नाही, असा आरोप करत काँग्रेसची कोंडी केली होती. ईडीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबाबत केलेल्या दाव्यांवरून प्रश्न उपस्थित करत या घोटाळ्यातील आरोपींशी बघेल यांचे काय संबंध आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या जनतेला सांगावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैसे जप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री संतापले आहेत, असे म्हणत मोदींनी थेट बघेल यांचे नाव या प्रकरणाशी जोडले होते. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल, याची हमी मोदींनी प्रचारादरम्यान दिली होती. याचा चांगला परिणाम मतदारांवर झाल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला हमी देतो की, मी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटिंग अॅपच्या प्रमोटर्सकडून पैसे मिळाल्याचा दावा ईडीने केला होता.

सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साइड बिझनेस असून, त्यांनी छत्तीसगडच्या विकासाला बेटिंगवर लावले असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. सट्टेबाजी ॲपचे प्रवर्तक छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना नियमित पैसे देत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाल्याचा दावा करत आतापर्यंत एकूण 508 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. 7 आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रोकड छत्तीसगडमध्ये हलवली गेल्याचे बोलले जाते.

दरम्यान, भाजपने असीम दास शुभम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत असे, हे खरे आहे का?, असीम दास यांना व्हॉइस मेसेजद्वारे रायपूरला जाऊन भूपेश बघेल यांना निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले होते, हे खरे आहे का? असे सवाल करण्यात आले होते. काँग्रेसच्या छत्तीसगडमधील पीछेहाटीसाठी मुख्यमंत्री बघेल यांच्यावर महादेव अॅपच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मोठा वाटा असल्याचे आता बोलले जात आहे.

महादेव अॅप प्रकरणात बघेल यांचे नाव आल्यानंतर भाजपने त्यांची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा मतदारांमध्ये निर्माण करण्यात यश मिळवले. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हे समीकरण असल्याचे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांचे नेते यशस्वी ठरले. याचा फायदा भाजपला झाला, तर काँग्रेस बॅकफूटवर गेली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com