New Delhi : सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा यांना मोदी सरकार पुन्हा एकदा मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. सीबीआय आणि ईडीच्या समन्वयासाठी केंद्र सरकार चीफ इन्वेस्टिंगेशन ऑफिसर (CIO) हे पद निर्माण करण्याच्या विचारात आहेत. CIO च्या प्रमुखपदी मिश्रा यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या मागणीनंतर ईडीचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच घेतला होता. मिश्रांना ईडीचे संचालक म्हणून १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मिश्रा यांचा कार्यकाळ तीन वेळा वाढवण्यात आला आहे. ही मुदतवाढ संपताच त्यांची CIO च्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
संजय कुमार मिश्रा कोण आहेत ?
संजय मिश्रा हे १९८४ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत.
ऑक्टोबर २०१८ मध्ये, मिश्रांना ईडीचे संचालक बनवण्यापूर्वी तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवले होते.
ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती.
आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.