Eknath Shinde On Niti Ayog : निती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले "राज्यात विविध..."

Shinde Attacks Uddhav Thackeray : राज्यात पायाभूत सुविधा, महिला सक्षमिकरणाची कामांना वेग
CM's With PM Narendra Modi
CM's With PM Narendra ModiSarkarnama

Niti Ayog Meeting and Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील शनिवारी (ता. २७ मे) दिल्लीत निती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामे, महिला सक्षमीकरण, रोजगाराबाबत चर्चा केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तत्कालीन आघाडी सरकारवर नाव न घेता टीका केली.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. त्यानुसार महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांच्या माध्यामातून विकसित भारत २०४७ चे व्हिजनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. २०४७ मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक समान दृष्टीकोन तयार करण्याचे आवाहन मोदींनी केल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

CM's With PM Narendra Modi
Ram Shinde Latest News : राम शिंदेंनी वाढवले विखेंचे टेन्शन; फडणवीसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्त केली लोकसभा लढवण्याची इच्छा

शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले की, "पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रात पायभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. यात समृद्धी महामार्ग, एमटीएचएल, पुणे-मुंबई सी-लिंक, मेट्रोची कामांना वेग दिला आहे. यासह भारत नेट-२ ने गावे जोडण्यात येतील. कोकणातून समुद्रात जणारे पाणी वळविण्याकडे लक्ष वेधले. आताच्या सरकारने राज्यात २८ प्रकल्पांना मान्यता दिली आहे. केंद्राकडून साथ मिळाली तर मोठी कामे मार्गी लागतील."

राज्यात महिला सक्षमिकरणासाठी पावले उचलल्याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली. शिंदे यांनी सांगितले, "राज्यात (Maharashtra) महिला सक्षमीकरणावर चर्चा केली. महिलांचे १ टक्के स्टँप ड्यूटी माफ केली. एसटी बस प्रवास ५० टक्के सवलत दिलेली आहे. चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्याकडेही लक्ष वेधले."

CM's With PM Narendra Modi
Shekhar Nikam: कोणत्याही विकासकामांचे श्रेय नको, पण...; आमदार शेखर निकमांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

राज्यात गुंतवणूक कशी वाढविता येईल, याबाबत बैठकीत शिंद यांनी चर्चा केल्याचे सांगितले. ते म्हणाले, "राज्यात नवीन उद्योग येण्यासाठी किटकट कायदे, नियम शिथिल केले पाहिजेत. कौशल्यविकासासाठी नवीन कोर्सेस आणले पाहिजेत. कौशल्य विकासातून तरुणांना रोजगार द्यावेत. गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर भर देण्याबाबत चर्चा केली."

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह तत्कालीन महाविकास आघाडीवर (MVA) टीका केली. शिंदे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात मेट्रो, कारशेडसह अनेक प्रकल्पाना स्पीड ब्रेक लावले होते. ते स्पीड ब्रेकर आम्ही सत्तेत येताच काढले. मेट्रो ३ प्रकल्प मार्गी लावण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईकरांवरील नाहक पडणारा भार वाचला आहे. 'एमटीएचएल' माध्यमातून उद्योगांसह रोजगारा निर्मितीची मोठी संधी निर्माण होणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com