Pushkar Singh Dhami on UCC मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार !

उत्तराखंड 2022 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी संहितेचा मुद्दा उपस्थित केला होता.
Pushkar Singh Dhami on UCC
Pushkar Singh Dhami on UCC Sarkarnama
Published on
Updated on

Uttarakhand Uniform Civil Code: देवभूमी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) कायदा लागू करण्यात येणार आहे. ट्विट करत पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

उत्तराखंड 2022 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी संहितेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपला (BJP) निवडणुकीच्या रिंगणात यश मिळण्यास मोठी मदत झाली. सरकार स्थापन केल्यानंतर आता धामी सरकारने समान नागरी कायदा लागू कऱण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

Pushkar Singh Dhami on UCC
Mumbra Conversion Case : राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस ; ..अन्यथा माफी मागा

धामी सरकारने UCC चा मसुदा तयार केला आहे. उत्तराखंड सरकारने समान नागरी संहिता (Uniform Divil Code) तयार करण्यासाठी मार्च 2022 मध्ये तज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीकडून सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे 2 लाख 31 हजार सूचना कोणाच्या समितीकडे पाठवण्यात आल्या होत्या.

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. यानुसार मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यात येणार आहे. यात लग्नापूर्वी मुली पदवीधर होतील अशीही तरतुद करण्यात आली आहे. याशिवाय या मसुद्यात पती-पत्नी दोघांनाही घटस्फोटाचे समान आधार असतील, पती आणि पत्नीला लागू असलेले घटस्फोट, पत्नीचा मृत्यू झाल्यास आणि तिच्या आई-वडिलांचा आधार नसेल, तर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पतीची असेल, यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतुद करण्यात आली आहे. (National News)

Pushkar Singh Dhami on UCC
Thackery And Shinde Group : वर्धापन दिनादिवशीच ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं; म्हणाले, "प्रतिमंडळ..."

याशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपची घोषणा करणे आवश्यक असेल. ते सेल्फ डिक्लेरेशनसारखे असेल ज्याचे वैधानिक स्वरूप असेल. त्याचबरोबर या मसुद्यात नोकरी करणाऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर पत्नीला मिळालेल्या भरपाईमध्ये वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीची जबाबदारीही नमूद करण्यात आली आहे. पत्नीने पुनर्विवाह केल्यास पतीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या भरपाईमध्ये पालकांचाही वाटा असेल.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com