रामविलास पासवानांच्या बंगल्यातून मुलगा चिराग बेदखल! ५ ट्रक सामानासह दाखवला बाहेरचा रस्ता

Chirag Paswan | Ramvilas Paswan | LJP : दिग्गज नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर इथे चिराग पासवान यांनी स्मारक उभे केले होते.
Chirag Paswan - Ramvilas Paswan
Chirag Paswan - Ramvilas PaswanSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या दिल्लीतील शासकीय बंगल्यातून त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) गटाचे नेते चिराग पासवान यांना बेदखल करण्यात आले आहे. शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हा बंगला रिकामा केला आहे. अधिकाऱ्यांनी घरातील सामान आणि इतर फर्निचर हे तब्बल ५ ट्रकमध्ये भरुन बंगला रिकामा केला आहे. अधिकारी बंगला रिकामा करण्यासाठी पोहचले असताना चिराग पासवान देखील इथे पोहचले होते. पासवान यांच्यानंतर हा बंगला आता रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना देण्यात आला आहे.

देशातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक असलेले रामविलास पासवान १९८९ पासून सातत्याने केंद्रात विविध पंतप्रधानांच्या सरकारमध्ये मंत्री होते. या दरम्यानच्या काळात त्यांना हाच सरकारी बंगला देण्यात आला होता. त्यामुळे हा बंगला लोकजनशक्ती पक्षाचे अधिकृत पत्ता बनला होता. पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना आणि संघटनात्मक बैठकांसाठी हाच बंगला वापरला जात असे. मात्र ऑक्टोबर २०२० मध्ये ७४ व्या वर्षी पासवान यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर एका वर्षाने चिराग पासवान यांना हा बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले होते.

Chirag Paswan - Ramvilas Paswan
शिवसेनेला खटकतीय राष्ट्रवादीची नरमाई; ठाकरेंची थेट पवारांकडे तक्रार

मात्र पासवान यांच्या मृत्यूनंतर पक्षाने बंगल्याच्या लॉनमध्ये त्यांची प्रतिमा लावून बंगल्याला अवैध पद्धतीने स्मारकामध्ये रुपांतरीत केले होते. मात्र केंद्र सरकारने २००० साली सरकारी बंगल्यांना स्मारकामध्ये रुपांतरित करण्यास मनाई केली आहे. परिणामी आता चिराग पासवान यांना या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र चिराग पासवान यांना लोकसभेचे सदस्य म्हणून देण्यात आलेला बंगला कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com