Cockroach Janata Party : देशाचं राजकारण ढवळून निघणार; प्रधानांचा राजीनामा होताच CJP चा कॉन्फिडन्स वाढला, फुलटाईम राजकारणावर मोठं विधान

CJP, Abhijeet Deepke : आमचे आंदोलन देशात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आमचा सध्या उद्देश असल्याचे सौरव दास म्हणाले आहेत.
Abhijeet Dipke, Narendra Modi
Abhijeet Dipke, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Resignation : नीट पेपरफुटीच्या मुद्यावर अखेर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाला मिळालेले हे पहिले मोठे यश आहे. त्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या सीजेपीच्या फुलटाईम राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

यूपीए सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर आम आदमी पक्षाची सुरूवात झाली होती. आता त्याचप्रकारे कॉक्रोच जनता पार्टीही राजकारणात प्रवेश करू शकते, असे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. दीपके यांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू होण्यापूर्वीच राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. पण आंदोलनाला यश आल्यानंतर आता सीजेपीचे नेते याउलट बोलू लागले आहेत.

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत राजकीय पक्षाची शक्यता थेट नाकारलेली नाही. पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना रांका यांनी भारतात कोणत्याही गोष्टीला कधीही 'नाही' म्हणू नये, असे कोड्यात टाकणारे उत्तर दिले. राजकारणात प्रवेशाबाबत त्यांनी थेट नकार दिला नसला तरी लगेच तसा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Abhijeet Dipke, Narendra Modi
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

सध्या माझ्या मनात एकच गोष्ट सुरू आहे. घरी जाऊन शांत झोपायचे, विश्रांती घ्यायची, कुटुंबासोबत राहायचे. मागील दोन महिन्यांपासून घरापासून दूर आहे. थोडा आराम करून त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू, असे रांका म्हणाले आहे. सीजेपीचे दुसरे प्रवक्ते सौरव दास यांनीही राजकारणात प्रवेश करणे हा सध्या CJP चा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Abhijeet Dipke, Narendra Modi
UPA ministers resignation : भाजपने ताणून धरलं, मंत्र्यांचे धडाधड राजीनामे..! 'यूपीए' काळातील 'ही' यादी वाचूनच बसेल धक्का; प्रधानांसाठी मोदी सरकार का घेतंय रिस्क?

आमचे आंदोलन देशात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आमचा सध्या उद्देश असल्याचे सांगत दास म्हणाले, देशात आधीच ७५० ते ८०० राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी एकही पक्षाने तरुणांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही. सत्तेत कोणताही पक्ष किंवा नेता असो, त्यांनी तरुणांसाठी काम करावे, हा आमचा सध्याचा अजेंडा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com