Basavaraj Bommai : अमित शाह यांच्या भेटीवरुन बोम्मई बरळले ; म्हणाले..

karnataka Maharashtra Border Dispute News update : कोणतीही तडजोड नाही.
 Basavaraj Bommai
Basavaraj BommaiSarkarnama

Basavaraj Bommai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार असल्याचे बातम्या समोर येत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळले आहेत. त्यांनी टि्वट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अवमान केला आहे. त्यांच्या टि्वटवरुन संताप व्यक्त करण्यात येत आहेत. (karnataka Maharashtra Border Dispute News update)

कर्नाटक सीमाप्रश्नी येत्या 14 डिसेंबरला अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार आहे. "गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीने काहीही होणार नाही, सीमाप्रश्नी कोणतीही तडजोड नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे," अशी वल्गना बोम्मई यांनी टि्वट करुन देशाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा (अमित शाह) अपमान केला आहे.

 Basavaraj Bommai
Shivshakti Bhimshakti : 'शिवशक्ती-भीमशक्ती' ची चर्चा सकारात्मकतेच्या पुढे जाणार का ?

"कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे," असे बोम्मई यांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्राच्या खासदारांनी गृहमंत्र्यांना भेटून काहीही फरक पडणार नाही, न्यायालयात कर्नाटकाची बाजू मजबूत आहे," असे त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापलेला असताना महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले आहे. याकरिता अमित शहा १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन सीमावादावर चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

जत तालुक्यातील ४० गावांसोबत अक्कलकोट आणि सोलापूरवर बसवराज बोम्मई यांनी दावा सांगितला. बोम्मईंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. पाठोपाठ हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मईंशी फोनवरून चर्चा करूनदेखील त्यांची चिथावणीखोर वक्तव्ये थांबली नाहीत. हा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com