Eknath Shinde | Devendra Fadnavis | Mohan Bhagwat
Eknath Shinde | Devendra Fadnavis | Mohan BhagwatSarkarnama

एकनाथ शिंदे वाचणार आता RSS चे विचार; मोहन भागवतांनी दिले जाडजूड पुस्तक भेट

Eknath Shinde | Devendra Fadnavis | Mohan Bhagwat : शिंदे-फडणवीस यांनी मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली.
Published on

मुंबई : शिवसेना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे वाचन करणार आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भागवत यांनी शिंदे-फडणवीस यांना सुनिल आंबेकर लिखित The RSS: Roadmaps for the 21st Century हे पुस्तक भेट दिले.

दरम्यान या भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. त्यापाठीमागे विशेष काही कारण नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एका कार्यक्रमाला होतो, तिथून एकत्र आलो. मोहन भागवत आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांची यापूर्वीही अनेकदा भेट घेतली आहे.

आजची भेटही सदिच्छा भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाल्यावर आशीर्वाद घेतले. आमची भूमिका हिंदुत्वाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचीच आहे, तीच घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. जाहीरपणे ती भूमिका आम्ही मांडली आहे.

तर या भेटीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर संघचालक मोहन भागवत यांची भेट घ्यायची होती. त्यातच आज ते मुंबईत होते. त्यामुळे आशीर्वाद घ्यायला आलो, सदिच्छा भेट घेतली. ५० मिनिटे चर्चा झाली. तसेच त्यांची भेट घेण्यामागे 100% हिंदुत्व मुद्दा आहेच, एकमेकांना सोबत घेऊन चांगलं काम करा असे भागवत बोलले. शिवाय काही पुस्तकही त्यांनी भेट दिली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com