Telangana : काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. या वेळी त्यांच्याबरोबर 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. रेवंथ रेड्डी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच दोन धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसकडून (Congress) जाहीर करण्यात आलेल्या सहा गॅरंटी योजनेच्या फाइलवर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी सही करत प्रचारात दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या सोबतच दिव्यांग महिलांना नोकरी देण्याच्या अश्वासनाच्या फाइलवरही सही केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, रेवंथ रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात आता पूनम प्रभाकर, श्रीधर बाबू, कोमटीरेड्डी वेकंट रेड्डी, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, दामोदर राजा नरसिंह, दना अनुसया, कोंडा सुरेखा, जुपल्ली कृष्णा राव, थुम्माला नागेश्वर राव यांचा समावेश असणार आहे. रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले असले तरी प्रत्यक्षात या योजनांचा लाभ कधी मिळणार, याकडे आता तेलंगणातील जनतेचे लक्ष लागले आहे.
महालक्ष्मी योजना : महिलांना दरमहा 2500 आणि 500 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार. तसेच महिलांना राज्य परिवहन टीएसआरटीसी (TSRTC) बसमध्ये मोफत प्रवास मिळणार.
रायथू भरोसा योजना : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपये आणि शेतमजुरांना 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार.
ज्योती योजना : अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज दिली जाणार.
इंदिरम्मा इंदलू योजना : ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना घरासाठी जमीन आणि 5 लाखांची आर्थिक मदत मिळणार.
युवा विकास योजना : विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांची मदत केली जाणार. या रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची फी भरण्यासाठी होईल.
चेयुथा योजना : वृद्ध आणि दुर्बलांना 4,000 रुपये पेन्शन दिली जाणार.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.