नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे ते आसामची राजधानी गुवाहाटी हे शहर. या राज्यात सध्या गंभीर पुरस्थिती असली तरी माध्यमांमध्ये गुवाहाटीतील रेडिसन हॉटेल झळकत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 50 आमदार या हॉटेलमध्ये तीन दिवसांपासून ठाण मांडून आहेत. आता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी डिवचलं आहे. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)
एकनाश शिंदे (Eknath Shinde) गटाच्या सर्व महत्वाच्या बैठका, सत्तास्थापनेचे समीकरण, महत्वाचे निर्णय गुवाहाटीतून घेतले जात आहेत. आसाममध्ये एकीकडे पुरस्थिती असताना गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलवरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याविरोधात गुरूवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर आंदोलन केले.
महाराष्ट्रातील आमदारानी परत जावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. तर शुक्रवारी आसाम काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही ही भूमिका मांडली. या आमदारांनी महाराष्ट्रात परत जावे. आसाममध्ये आमदारांच्या खरेदी-विक्रीचा बाजार मांडू नये, अशी टीका त्यांनी केली.
यापार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आसामध्ये येण्यापासून मी कुणालाही रोखू शकत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये बुकिंग केले तर मी तुम्हाला येऊ नका, असं कसं सांगू शकतो. देशात सर्वत्र फिरण्याचा, राहण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असं सरमा यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुट्टीसाठी आसामला यावे, अशा शब्दांत सरमा यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरूवातीला सुरतमध्ये होते. तिथून त्यांना विशेष विमानाने गुवाहाटीला हलवण्यात आले आहे. तिथं आसाम भाजपकडून त्यांची बडदास्त ठेवली जात असल्याची चर्चा आहे. भाजपचे काही आमदारही बंडखोर आमदारांना भेटल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.