राजकारण तापलं : योगींसाठी अमित शहा पोहचले थेट निवडणूक कार्यालयात

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून भाजपने 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा केला आहे.
Yogi Adityanath, Amit Shah
Yogi Adityanath, Amit ShahSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे (UP Election 2022) वातावरण आता चांगलंच तापलं आहे. पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या (Assembly Election) रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चारवेळा खासदार राहिलेल्या गोरखपूरमधूनच (Gorakhpur) त्यांनी अर्ज दाखल केला.

भाजपकडून (BJP) योगींच्या गळ्यातच मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली जाणार आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक (Election) लढवली जात आहे. त्यामुळे योगींनी अर्ज दाखल करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) स्वत: निवडणूक कार्यालयात हजर राहिले. शहा यांनी यावेळी उपस्थित राहून विरोधकांना स्पष्टपणे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी निवडणूक लढवत आहेत. शहा हे उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.

Yogi Adityanath, Amit Shah
निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; ईडीकडून भाच्याला अटक

अर्ज भरल्यानंतर योगी व अमित शहांची संयुक्त सभा झाली. यावेळी बोलताना शहा यांनी योगींच्या कामाचे कौतुक करत विरोधकांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी 25 वर्षानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य आणले आहे. या निवडणुकीत भाजप 300 पेक्षा जास्त जागा मिळवेल. विरोधक याआधीही भाजपकडून पराभूत झाले आहे. यापुढेही त्यांचा पराभव होईल.

आज मी गृहमंत्री म्हणून अभिमानाने सांगू शकतो की, योगींनी उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) माफियांच्या तावडीतून मुक्त केले आहे. आता राज्यात माफिया हे तुरूंग, राज्याबाहेर किंवा सपाची विधानसभा उमेदवारांची यादी अशा केवळ तीन ठिकाणी दिसतात, अशी टीका अमित शहा यांनी केली. योगी म्हणाले, राज्यात पाच वर्षात भाजपच्या डबल इंजिनमुळे सर्व क्षेत्रांत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रत्येक गरीब, शेतकरी, तरूणांपर्यंत सरकारी योजना पोहचवत विकास केला आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे. पण गोरखपूर हा त्यांचाच बालेकिल्ला असल्याने ही निवडणूक त्यांच्याशी अत्यंत सोपी मानली जात आहे. सपाने भाजपमधील दिवंगत नेत्याच्या पत्नीला तिकीट दिले आहे. तर भीम आर्मीचे चंद्रशेखऱ आझाद यांनीही या मतदारसंघात उडी घेतली आहे. विद्यमान आमदारांचे तिकीट कापत भाजपने योगींना उमेदवारी दिली आहे. आधी मथूरा किंवा अयोध्या या मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com