Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSarkarnama

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; ईडीकडून भाच्याला अटक

मनी लाँर्डिंग प्रकरणात मुख्यमंत्री चन्नी यांच्या भाच्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election 2022) तोंडावर मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) मनी लाँर्डिंग प्रकरणात त्यांच्या भाच्याला गुरूवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कारवाई राजकीय असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पंजाबमधील निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. राज्यात 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री चन्नी दोन मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. त्यातच त्यांचे भाचे भूपिंदरसिंग हनी (Bhupinder Singh Honey) अटक झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याअंतर्गत त्यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Punjab Election Update)

Charanjit Singh Channi
ह्याचे डोके फिरले आहे! मुख्यमंत्री राव यांच्यावर आव्हाड संतापले

मागील महिन्यात ईडीने हनी यांच्या घरासह विविध ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. गुरूवारी ईडीकडून त्यांची दिवसभर चौकशी सुरू होती. त्यानंतर रात्री अटक करण्यात आली. या कारवाईनंतर काँग्रेसने (Congress) संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

खरगे म्हणाले, ही राजकीय स्वरूपाची कारवाई आहे. दबाव टाकण्यासाठीच अटक करण्यात आली आहे. एका दिवसांत कुणावरही कारवाई होत नाही. ईडीकडून एखाद्याला अटक करायची असल्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी घेतला जातो. चन्नी हे अनुसुचित जातीतील मुख्यमंत्री आहेत. त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खरगे यांनी भाजवर केला.

भाच्यावर ईडीची धाड पडल्यानंतर चन्नी म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांवरही कारवाई करण्यात आली होती. तोच पॅटर्न आता पंजाबमध्ये दिसत आहे. ईडीकडून माझ्यासह मंत्री आणि पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही दबावाला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही चन्नी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com