'सीएनजी'वर वाहन चालवताय? आजपासून मोजावे लागणार जादा पैसे

स्वस्त इंधन पर्याय म्हणून वाहनचालकांकडून सीएनजीला पसंती दिली जात होती. आता सीएनजीवर गाडी चालवणेही महाग झाले आहे.
CNG
CNGFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे स्वस्त इंधन पर्याय म्हणून वाहनचालकांकडून सीएनजीला (CNG)पसंती दिली जात होती. आता सीएनजीवर गाडी चालवणेही महाग झाले आहे. सीएनजीच्या प्रतिकिलो 2.28 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही चालू महिन्यातील दुसरी दरवाढ आहे. सरकारने नैसर्गिक वायूच्या 62 टक्के वाढ केल्याने सीएनजी महागला आहे.

सीएनजीच्या दरात दिल्ली आणि परिसरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत ही वाढ प्रतिकिलो 2.28 रुपये असून, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये ही वाढ प्रतिकिलो 2.55 रुपये आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली आहे. यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो 49.76 रुपयांवर पोचला आहे. यामुळे स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना भुर्दंड बसू लागला आहे. याआधी 1 ऑक्टोबरला सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.28 रुपये वाढ करण्यात आली आहे. चालू महिन्यात सीएनजी प्रतिकिलो 4.56 रुपयांनी महागला आहे.

CNG
दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा गृहिणींना 'शॉक'

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली आहे. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे.

CNG
मोठी बातमी : मुंबई पोलिसांसमोर सीबीआय संचालक चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com