महाराष्ट्र नव्हे देशभरातच कोळशाची टंचाई; ही आहेत तीन प्रमुख कारणं...

उन्हाळ्यामुळे विजेची मागणीही वाढल्याने अनेक राज्यांना भारनियमन करावे लागत आहे.
Coal shortage Reasons, Reasons for coal shortage in India, Coal shortage News Updates, Load Shedding News Updates
Coal shortage Reasons, Reasons for coal shortage in India, Coal shortage News Updates, Load Shedding News UpdatesSarkarnama

नवी दिल्ली : कोळशाची टंचाई (Coal Shortage) निर्माण झाल्याने महाराष्ट्रात (Maharashtra) भारनियमन सुरू करण्यात आले आहे. पण भाजपने (BJP) ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली आहे. पण प्रत्यक्षात केवळ महाराष्ट्रच नव्हे देशातच कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे विजेची मागणीही वाढल्याने अनेक राज्यांना भारनियमन (Loadshedding) करावे लागत आहे. (Reasons for coal shortage in India)

देशातील 70 टक्के वीज पुरवठा हा औष्णिक वीज प्रकल्पांमधून (Thermal Power Plant) होतो. एकूण 173 प्रकल्प असून त्यापैकी 85 प्रकल्प हे प्रामुख्याने देशांतर्गत कोळशावर अवलंबून आहेत. तर 11 प्रकल्प हे आयात केलेल्या कोळशावर चालतात. याठिकाणची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रकल्प हे कोळशावर चालतात. पण सध्या देशातील 100 हून अधिक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांध्ये कोळशाचा साठा 25 टक्क्यांहून कमी आहे. तर जवळपास 50 टक्के प्रकल्प असे आहेत जिथे केवळ 10 टक्के साठा आहे. त्यामुळे अनेक राज्यांची कोल इंडियाकडे (Coal India) कोळसा पुरवठ्याची मागणी वाढली आहे.

Coal shortage Reasons, Reasons for coal shortage in India, Coal shortage News Updates, Load Shedding News Updates
सिब्बलांनी अर्णब गोस्वामींच्या निकालाची ढाल वापरली, तरीही मलिक तुरूंगातच राहणार!

सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अॉथोरिटी (CEA) च्या डेटानुसार, 19 एप्रिल 2022 रोजी औष्णिक वीज प्रकल्पातून देशांतर्गत कोळशाचा वापर करून 182.39 गिगावॅट वीज निर्मिती होत होती. यावेळी या प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा 34 टक्के होता. तर आयात केलेल्या कोळशाचा वापर करून 16.73 गिगावॅट वीज निर्मिती होत होती. सध्या देशातील नऊ औष्णिक प्रकल्प बंद असून त्याद्वारे 3.56 गिगावॅट वीजनिर्मिती होत होती.

कोळशाची टंचाई का?

प्रामुख्याने वीजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. 2021 मध्ेय दर महिन्याला वीजेची मागणी 124.2 अब्ज युनिट (BU) पर्यंत पोहचली होती. तर 2019 मध्ये ही मागणी 106.6 बीयू होती. यंदा हा आकडा 132 बीयूवर पोहचला आहे. तसेच आयात होणारा कोळसाही कमी झाला असून त्याचाही परिमाण वीज निर्मितीवर होत आहे. त्याचप्रमाणे वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा करण्यासाठी रेल्वे रेकही अपेक्षेप्रमाणे उपलब्ध होत नाहीत. या तीन कारणांमुळे प्रकल्पांमधील साठा संपू लागल्याची स्थिती आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही भीषण कोळसा टंचाई होती. केवळ चार दिवस पुरेल एवढाचा साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे कोळशा खाणींमधील उत्पादन वेगाने वाढवावे लागले होते. पावसाळ्यात गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तमिळनाडूमधील खाणींमध्ये पाणी घुसल्याने उत्पादन घटले होते.

Coal shortage Reasons, Reasons for coal shortage in India, Coal shortage News Updates, Load Shedding News Updates
जाहीर खिल्ली आहे ही! मिटकरींविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानंच थोपटले दंड

कोल इंडियाने वाढवले उत्पादन

कोल इंडिया कंपनीने राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवले आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत कोल इंडियाकडून वीज प्रकल्पांना पुरवल्या जाणाऱ्या कोळशामध्ये 14.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत आहे. कोळशाचे उत्पादन 16.4 लाख टनांवर पोहचले असून मागील वर्ष हे 14.3 टन एवढे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com