Lok Sabha Election 2024: आधी मिमिक्री केली अन् आता मोदींविरोधात थेट वाराणसीतून निवडणूक लढवणार 'हा' कॉमेडियन!

Shyam Rangila Vs Narendra Modi: श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहूब मिमिक्री करणारा कलाकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मोदींच्या मिमिक्रीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याच्या मिमिक्रीचं कौतुक केलं होतं.
Shyam Rangila, Narendra Modi
Shyam Rangila, Narendra ModiSarkarnama

Varanasi Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नक्कल करुन प्रसिद्ध झालेला कॉमेडियन श्याम रंगीला वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. श्याम रंगीलाने (Shyam Rangila) एक्स अकाऊंटवरुन मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. कॉमेडी क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव झाला असून मीही कॉमेडीच्या माध्यमातून राजकारण करु शकतो असं त्यांने म्हटलं आहे. तसेच आपणाला कॉमेडीत हवे तसे काम करता येत नसल्याचा आरोपदेखील त्याने केला आहे.

श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची हुबेहूब मिमिक्री करणारा कलाकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मोदींच्या मिमिक्रीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) त्याच्या मिमिक्रीचं कौतुक केलं होतं. याच श्याम रंगीलाने (Shyam Rangila) निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून त्याने थेट पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं घोषीत केलं आहे. त्यामुळे आता वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात श्याम रंगीलाची उमेदवारी अशी लढत पाहायला मिळू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींसह राहुल गांधीचीही करतो मिमिक्री

श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीदेखील मिमिक्री करतो. नेत्यांची मिमिक्री केल्यामुळे तो खूप फेमस झाला होता. मात्र काही दिवसांनी त्याच्या मिमिक्रीवर बंधन घालण्यात आली होती. याच कारणामुळे आता त्याने मोदींविरोधात शड्डू ठोकला आहे. कारण श्यामने निवडणूक लढवण्याचं कारणच त्याच्या मिमिक्रीवर घालण्यात आलेलं बंधन हे असल्याचं सांगितलं.

Shyam Rangila, Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी मागितली भाजपसाठी मतं...

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. शिवाय याआधी सूरत आणि इंदूरमधील उदाहरण देत त्याने म्हटलं, "लोकशाही धोक्यात नाही हे दाखवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. वाराणसीत लोकांना माझ्या रुपाने मतदानासाठी पर्याय उपलब्ध व्हावा आणि निदान इथे (Varanasi Lok Sabha Constituency) सूरत किंवा इंदूरसारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मी ही निवडणूर लढवत आहे." सूरत आणि इंदूर या दोन लोकसभा मतदारसंघांतून दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजप तिथे जिंकणार असल्याचं जवळपास फायनल झालं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com