Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी मागितली भाजपसाठी मतं...

Adhir Ranjan Chowdhury News : बंगालमधील एका प्रचारसभेत अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांचा विजय होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
Adhir Ranjan Chowdhury
Adhir Ranjan ChowdhurySarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कंबर कसली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून विविध राज्यांमध्य मित्रपक्षांना सोबत घेत भाजपला लक्ष्य केले जात आहे. प्रचारात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केल्याने खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीमध्ये नाही. राज्यात काँग्रेस (Congress) आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे अनेक जागांवर तिरंगी लढत होत आहे. अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्याकडून प्रामुख्याने ममतांना लक्ष्य केले जात आहे. या दोघांमधील वादामुळेच आघाडी झाली नसल्याचीही चर्चा आहे.

Adhir Ranjan Chowdhury
Congress News : दिल्लीत काँग्रेसला घरघर; अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर दोन माजी आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

याच वादातून चौधरी यांनी मंगळवारी थेट भाजपला (BJP) मतदान करण्याचे आवाहन एका प्रचारसभेत मतदारांना केले. जंगीपूर येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, ‘काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विजय आवश्यक आहे. असे झाले नाही तर धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल. टीएमसीला मत देण्याचा अर्थ भाजपलाच मत देणं असा आहे. त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही भाजपलाच मत द्या.’  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बोलण्याच्या भरात थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी सावरून घेत भाजप आणि टीएमसीलाही मत देऊ नका, असे स्पष्ट केले. ही निवडणूक देशाचे भविष्य निश्चित करणारी आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करा. मोदी आधी 400 पार चा प्रचार करत होते. पण आता ते असे बोलत नाही. आधीच ते शंभर जागांवर हरले आहेत.

दरम्यान, चौधरी यांच्या या विधानंतर टीएमसीनेही काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, अधीर रंजन चौधरी हे भाजपची बी टीम आहेत. बंगालमध्ये भाजपचे डोळे आणि कान म्हणून काम केल्यानंतर आता अधीर रंजन चौधरी भाजपचा आवाज बनले आहेत. भाजपला मतदान करण्यास ते खुलेपणाने सांगत आहेत.

Adhir Ranjan Chowdhury
Lok Sabha Election 2024 : फक्त मुस्लिमांनाच जास्त मुलं असतात का? मला 5 आहेत! खर्गेंचा मोदींवर पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com