मोदी सरकारच्या बजेटच्या दिवशीच एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त

सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून एलपीजी (LPG) सिलिंडरचा दर 91.50 रुपयांनी कमी केला आहे.
LPG Cylinder
LPG CylinderSarkarnama

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget) दिवशीच सरकारी तेल कंपन्यांनी चांगली बातमी दिली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात आजपासून 91.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हॉटेलचालकांसह इतरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात सलग 4 महिन्यांत 484 रुपयांची वाढ झाली होती. नंतर नवीन वर्षात 1 जानेवारीपासून हा दर 102.50 रुपयांनी कमी केला होता. यानंतर आज सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात 91.50 रुपयांची कपात केली. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर 1 हजार 907 रुपयांवर आला आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरन्ट, खाद्यपदार्थ विक्रेते आणि चहावाले यांना दिलासा मिळाला आहे. याआधी 1 जानेवारीला या सिलिंडरच्या दरात 102.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.

LPG Cylinder
वाद पेटला! जामीन फेटाळताच नितेश राणेे-पोलीस आमनेसामने

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची दरवाढ

1 सप्टेंबर (2020) - 75 रुपये

1 ऑक्टोबर - 43 रुपये

1 नोव्हेंबर -266 रुपये

1 डिसेंबर - 100 रुपये

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची दरकपात

6 ऑक्टोबर - 2 रुपये 50 पैसे

1 जानेवारी (2021) - 102.50 रुपये

1 फेब्रुवारी - 91.50

LPG Cylinder
आमदार नितेश राणेंना मोठा धक्का; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना बसणाऱ्या महागाईच्या झळा आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, सरकारी कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत एलपीजी सिलिंडरचा दर जवळपास 900 रुपयांवर आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात झाली असली तरी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com