New Parliament : संसद भवन उद्धघाटनापूर्वीच केजरीवाल, खर्गे अडचणीत ; राष्ट्रपतींबाबत वादग्रस्त विधान करणं भोवलं..

New Parliament News : नव्या संसद भवनाचे उद्धघाटन सोहळ्यास वेगळं वळण लागलं
New Parliament News
New Parliament News Sarkarnama
Published on
Updated on

New Parliament News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता.२८) नव्या संसद भवनाचे उद्धघाटन होत आहे. त्याला काही विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. (Complaint filed against Arvind Kejriwal and Mallikarjun Kharge)

या नवीन संसद भवनाचे उद्धघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

New Parliament News
Pune News : पहिल्याच निवडणुकीत आघाडीची वज्रमूठ ढिली ; पुण्याच्या जागेवरील दोन्ही काँग्रेस दाव्याने वाद वाढणार !

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करुन वादग्रस्त विधान केल्याचा आरोप या केजरीवाल आणि खर्गे यांच्यावर करण्यात आला आहे.

खर्गे काय म्हणाले होते..

काही दिवसापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की ज्यावेळी या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन झाले होते, तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले नव्हते, आता या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेले नाही. आम्ही एससी, एसटी समाजातील व्यक्तींना महत्व देतो, असे भाजपचे नेते म्हणतात, पण ज्याठिकाणी या समाजातील व्यक्तींना महत्व द्यायला हवे, तेथे ते त्यांना महत्व देत नाहीत.

New Parliament News
Pune News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का ? ; अजितदादांनी सांगितली आतल्या गोटातील माहिती..

केजरीवाल काय म्हणाले होते...

नवीन संसद भवनाच्या उद्धघाटनावर आम आदमी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. याबाबत अरविंद्र केजरीवाल यांनी टि्वट करीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. "श्रीराम मंदीराच्या भूमिपूजनाला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मोदी सरकारने निमंत्रण दिले नव्हते, आता या नवीन संसद भवनाचे उद्धघाटन मुर्मू यांच्या हस्ते होणे गरजेचे होते.

देशात एससी आणि एसटी समाजाला अशुभ मानले जात आहे का, असा प्रश्न या समाजातील व्यक्ती विचारत आहेत. त्याना का बोलविण्यात येत नाही, असा त्यांचा सवाल आहे. रविवारी होत असलेल्या या संसद भवनाच्या उद्धघाटन सोहळ्यावर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांना बहिष्कार टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com