भाजप सोडताच आठवडाभरात बड्या नेत्याला लॉटरी; सपत्नीक ठरले तिकिटाचे मानकरी!

गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Elections 2022) रणधुमाळी सुरू आहे.
Michael Lobo
Michael LoboSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Elections 2022) रणधुमाळी सुरू आहे. भाजपच्या (BJP) बड्या नेत्याने मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी आपल्या सरपंच पत्नीसह काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आता आठवडाभरातच काँग्रेसकडून तिकिटाची लॉटरी लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील (Goa) राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत शिवोली - डेलिया लोबो (Delailah Lobo), साल्गाव - केदार नाईक, अल्डोना - कार्लोस अल्वेरा फरेरा, प्रियोळ दिनेश जालमी आणि कुडतरे - मोरेनो रिबेलो यांचा समावेश आहे. डेलिया लोबो यांचे पती मायकेल लोबो (Michael Lobo) हे भाजप सरकारमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री होते. त्यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देऊन डेलिया यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Michael Lobo
पहिल्याच परीक्षेत पडळकर नापास! खानापूर नगरपंचायतीत भाजपला भोपळा

काँग्रेसने जाहीर केलेल्या याआधीच्या यादीत मायकल लोबो यांना तिकिट जाहीर झाले आहे. मायकल लोबो हे कळंगुट मतदारसंघाचे आमदार होते. मायकल लोबो यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का होता. त्यांना कळगुंटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांच्या पत्नी डेलिया यांना शिवोलीमधून उमेदवारी मिळाली आहे.

Michael Lobo
विशाल फटेनं बोट दाखवलेला 'सांगलीवाला' आला रडारवर!

भाजपला गळती

राज्यात भाजपला गळती लागल्याचे चित्र असून, आतापर्यंत 4 आमदारांनी पक्ष सोडला आहे. मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. अलिना सलडान्हा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com