काँग्रेस देश पिंजून काढणार; ऐंशी वर्षांपुर्वी महात्मा गांधींचा 'भारत छोडो'चा नारा अन् आता भारत जोडो!

काँग्रेसच्या तीनदिवसीय नवसंकल्प शिबीराचा समारोप रविवारी झाला.
Congress Latest Marathi News
Congress Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

उदयपूर : देशातून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी 'भारत छोडो'चा नारा दिला आहे. त्याची आठवण करून देत काँग्रेसने रविवारी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. महात्मा गांधींच्या जयंतीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. (Congress Chintan Sivir Latest Marathi News)

काँग्रेसच्या तीनदिवसीय नवसंकल्प शिबीराचा समारोप रविवारी झाला. समारोपाच्या भाषणामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या यात्रेची घोषणा केली. ही यात्रा दोन ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेमध्ये तरूण नेत्यांसह ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं या यात्रेचे आयोजन केलं आहे.

सर्व समाजघटकांतील लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी, भाजप (BJP) सरकारच्या काळात समाजा-समाजामध्ये निर्माण झालेली तेढ दूर करून एकोपा निर्माण करण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते राहुल गांधी या संपूर्ण यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर 15 जूनपासून जनजागरण मोहिम राबवली जाणार आहे. भाजपच्या काळात वाढलेली बेरोजगारी, इंधन दरवाढ, सामाजिक तेढ अशा विविध मुद्दयांवर यातून लोकांना जागृत केले जाणार आहे. सोनिया गांधी यांनी भाषणाच्या शेवटी आपण जिंकणार, आपण जिंकणार, आपण जिंकणार हाच आपला संकल्प आहे, असं सांगितलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. विचारधारेला वाचवण्याची आपली जबाबदारी आहे. आपल्याला जनतेत जायला हवे. त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात. जनतेशी आपल्याला पुन्हा नाळ जोडायची आहे. काँग्रेस पक्षच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, हे जनतेला माहिती आहे. हे शॉर्टकटने होणार नाही. त्यासाठी घाम गाळावा लागणार आहे, असंही ते म्हणाले.

पंजाबमधील अंतर्गत वादावरही राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चेला संमती असते. भाजप आणि आरएएस अशी चर्चा करत नाही. पण त्यामुळेच काँग्रेसवर सर्वाधिक टीका होते. भाजप सरकारने देशातील युवकांचे भविष्य अंधारात ढकललं आहे. बेरोजगारी व महागाई वाढत आहे. प्रादेशिक पक्ष भाजपला रोखू शकत नाही. कारण हा विचारधारेचा मुद्दा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com