Sucharita Mohanty News : प्रचाराला पैसे मिळत नसल्याने काँग्रेस उमेदवाराने पक्षाला तिकीट केलं परत!

Congress Loksabha Election : जाणून घ्या, कोणत्या मतदारसंघातून मिळाली होती उमेदवारी आणि नेमकं काय म्हणाल्या आहेत?
Sucharita Mohanty
Sucharita MohantySarkarnama

संदीप चव्हाण -

Loksabha Election 2024 : प्रचाराला पैसे मिळत नाहीत म्हणून काँग्रेसच्या एका महिला उमेदवारानं थेट निवडणुकीतूनच माघार घेतल्याचं समोर आलंय. सुचरिता मोहंती, असं या महिला उमेदवाराचं नाव आहे. देशातील कोणत्या राज्यात हा प्रसंग घडलाय?

तर ओडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे. ओडिशात 13, 20, 25 मे आणि 1 जून अशा चार टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत, तर पुरी लोकसभा मतदारसंघासाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sucharita Mohanty
Karnataka Sex Scandal: 'सेक्स स्कँडल' प्रकरणात मोठी कारवाई; एच.डी.रेवण्णा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

पुरी लोकसभा मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती(Sucharita Mohanty) यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करत त्यांनी आपल्याला मिळालेलं पक्षाचं तिकीट पक्षाला परत केलं आहे. पैसे नसल्यानं प्रचार करता येत नव्हता. त्यामुळं मी निवडणुकीतून माघार घेत आहे, असा ई-मेल त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला.

पक्ष निधी देत नसल्यामुळं मी तिकीट परत करत असल्याचंही त्या म्हणाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजोय कुमार यांनी तर माझा खर्च मीच करावा, असं स्पष्टपणे सांगितल्याचा आरोपही मोहंती यांनी केला आहे. मतदारसंघात प्रचार करण्यासाठी माझी जेवढी बचत होती ती मी खर्च केली. लोकवर्गणीतून पैसे गोळा करण्याचाही प्रयत्न केला पण लोकांकडून काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

व्यवसायानं पत्रकार असलेल्या सुचरिता मोहंती यांनी 2014मध्ये देखील कॉंग्रेसकडून(Congress) निवडणूक लढवली होती. त्यावेळी बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मोहंती यांना 2,89,800 इतकी मतं मिळाली होती.

Sucharita Mohanty
CV Ananda Bose : ऐन लोकसभेच्या धामधुमीत राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; काय आहे प्रकरण?

एकूणच काय तर एरव्ही पक्षाकडून तिकीट मिळावं म्हणून नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असते पण ओडिशात मात्र पक्षानं दिलेलं तिकीट उमेदवारानं पक्षालाच साभार परत करण्याचा विलक्षण प्रसंग घडला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com