Congress Constitution Amendments : काँग्रेसच्या संविधानात मोठे बदल : पक्षांतर्गत आरक्षण होणार लागू !

Congress Constitution Amendments : दलित आणि ओबीसी मतांसाठी काँग्रेसचा मोठा डाव?
Congress Constitution Amendments
Congress Constitution AmendmentsSarkarnama
Published on
Updated on

Congress Constitution Amendments : छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या ८५ व्या राष्ट्रीय अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या घटनेत 5 मोठ्या दुरुस्त्या केल्या आहेत. यामध्ये आरक्षण, सदस्यत्व, एआयसीसी सदस्य, सीडब्ल्यूसी आणि संस्थेच्या युनिट्सबाबतचे नियम बदलले गेले आहेत. दलित ओबीसी मतांसाठी हा काँग्रेसचा मोठा राजकीय डावपेच असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेस पक्षांतर्गत आरक्षण :

पीसीसी आणि एआयसीसीमध्ये आरक्षण लागू करण्यात येणार आहे. अनुसुचित जाती (SC) आणि अनुसुचित जमाती (ST) आणि तसेच इतर मागासवर्गीयासांठी (OBC) 50 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. महिला आणि 50 वर्षांखालील लोकांसाठी 50 टक्के जागांची तरतूद करण्यात आली आहे.

सदस्यत्वाचा निर्णय :

काँग्रेसकडे आता कागदोपत्री सदस्यत्व ग्राह्य धरले जाणार नाही. फक्त डिजिटल पद्धतीने पक्षाचे सदस्यत्व घेता येणार आहे. काँग्रेस सदस्यत्वाच्या नावामध्ये वडीलांसोबतच आई आणि पत्नीच्या नावाचाही समावेश करण्यात येणार आहे.

एआयसीसी सदस्याबाबत निर्णय :

आता एआयसीसी सदस्यासाठी फक्त 6 पीसीसी प्रतिनिधी आवश्यक आहेत, यापूर्वी ही संख्या 8 सदस्य इतकी होती. एआयसीसीच्या सदस्यांची संख्या 1240 वरून 1653 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये निवडणूका होणार नाहीत :

यापुढे आता काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये ( CWC) मध्ये 23+2 ऐवजी 35 सदस्य असतील.यापैकी 50% एसी/एसटी/ओबीसी/एआयएन/युवा/महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान (काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान झाले तर), माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष, माजी अध्यक्ष, लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते याचे सदस्य असतील.

*संघटनेच्या रचनेत बदल होणार आहे

*थर्ड जेंडरला (तृतीय लिंगी व्यक्ती) संस्थेत स्थान मिळेल

*पंचायत समिती व प्रभाग समिती स्थापन करण्यात येणार आहे

Congress Constitution Amendments
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत; म्हणाल्या, "आता थांबण्याची वेळ..."

२६ फेब्रुवारीचा कार्यक्रम :

काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. पहिल्याच दिवशी सुकाणू समितीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि घटनेत दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज एकमताने घटनेत दुरुस्ती करण्यात आली.

उद्या सकाळी 10.30 वाजता राहुल गांधी प्राथमिक अधिवेशनाला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे शेवटचे भाषण करणार असून दुपारी 3 वाजता सभा होणार आहे. ज्याला काँग्रेसचे बडे नेते संबोधित करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com