RSS sexual harassment case : 'आरएसएस'च्या लोकांवर लैंगिक छळाच्या आरोपानं खळबळ; 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, शिबिरातला 'कच्चा-चिट्ठा'ही मांडला

Congress Demands Inquiry After Kerala Engineer Anandu Aji Post Alleging Sexual Harassment in RSS : केरळमधील कोट्टायमचा रहिवासी असलेल्या एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आयुष्य संपवल असून त्याने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'RSS'वर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
RSS sexual harassment case
RSS sexual harassment caseSarkarnama
Published on
Updated on

RSS controversy Kerala : केरळमधील कोट्टायमचा रहिवासी असलेल्या एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली. तिरुअनंतपुरममधील थंपनूर इथल्या एका लॉजमध्ये 9 ऑक्टोबरला त्याचा मृतदेह आढळला.

आनंदु अजी, असे मृतदेह आढळलेल्याचे नाव आहे. या युवकाने मृत्यूपूर्वी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. यात त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निगडीत असलेल्या लोकांवर त्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

मयत आनंदु अजी, याने समाज माध्यमांवर (Social Media) केलेल्या पोस्टमध्ये संघाची वडिलांमुळे लहानपणीच संबंध आल्याचे म्हटले आहे. तेव्हापासूनच लैंगिक आणि शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला. शेजारी असलेल्या एनएमकडून तीन वर्षांचा असताना लैंगिक शोषण झाले. तसंच संघ, आयईटीसी आणि ओटीसी शिबिरांमध्ये देखील असेच प्रकार झाल्याचे म्हटले आहे.

आनंदु अजी याने पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, माझ्या मृत्यूचे कारण कोणत्याही नातेसंबंधाशी नाही. उलट एक मानसिक खोल आघात आहे. काही वर्षांपूर्वी त्याला ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) असल्याचे निदान झाले होते. हे देखील 'आरएसएस'च्या (RSS) लोकांनी केलेल्या शोषणामुळे झाल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

RSS sexual harassment case
Mazi Shala Sundar Shala : 'आनंदाच्या शिधा'नंतर शिंदेंची आणखी एक योजना बंद? लाखो रुपयांची दिली होती पारितोषिके, 'माझी शाळा, सुंदर शाळा योजने'बाबत संभ्रमावस्था

काँग्रेस घटनेवर आक्रमक

आनंदु अजी या युवकाच्या मृत्यूवर काँग्रेस आक्रमक झाले आहे. काँग्रेसने या मुद्यावरून त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर आरएसएसवर गंभीर आरोप केले आहे. या घटनेची संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे. या घटनेशी निगडीत असलेल्या, 'आरएसएस'मधील लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

RSS sexual harassment case
Kolhapur Mayor Reservation : महापौर आरक्षणानंतर महापालिका रणांगणांची उलटी गिनती; कारभाऱ्यावर ठरणार महायुतीची दिशा

काँग्रेसकडून चौकशीची मागणी

आत्महत्येपू्वी आनंदु अजीने दिलेल्या मुद्यांचा संदर्भ देत 'आरएसएस'वर काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. आनंदु अजीवर अनेकांनी अत्याचार केले आहेत. 'आरएसएस'च्या वेगवेगळ्या शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांवर अत्याचार होतो. 'आरएसएस'चे लोकं हे अत्याचार करत आहेत. आनंद अजी असाच 'आरएसएस'चा शिकार झाला आणि त्या मानसिक त्रासाला समोरे जावे लागले. त्यामुळे या घटनेची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने आनंदु अजीने लिहिलेल्या पोस्टमध्ये आयुष्यभर 'आरएसएस'कडून वेदना सहन कराव्या लागल्याकडे लक्ष वेधले.

शिबिरांमध्ये शोषण

आनंदु अजीचे मृत्यूपूर्वीच्या पोस्टमध्ये 'आरएसएस'विषयी गंभीर मुद्दे उपस्थित केले आहे. त्याचे लहानपणापासून लैंगिक शोषण झाले. तसंच छावण्यांमध्ये लैंगिक शोषणाव्यतिरिक्त, त्याला काठ्यांनी मारहाणही करण्यात आली, याकडे लक्ष वेधताना, त्याने इतर कोणत्याही संघटनेत 'आरएसएस'इतका द्वेष नाही. आरएसएस सदस्यांशी मैत्री करू नका, जरी ते तुमचे वडील, भाऊ किंवा मुलगा असले तरीही, त्यांना दूर ठेवा, असे आवाहन केलं आहे. शिबिरांमधील शोषणाबद्दल पुरावा नाही, त्यामुळे कोणीही विश्वास ठेवणार नाही. परंतु त्याचे जीवन त्याचा पुरावा आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आनंदु अजीने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती कोणालाही दिली नव्हती. एका नातेवाईकाने सांगितले की, कुटुंबाला या घटनांबद्दल माहिती नव्हती. परंतु, त्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांना तो अलीकडेच समोर जात होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com