ध्वजस्तंभावरून पडणारा झेंडा सोनिया गांधींनी झेलला अन्...

काँग्रेसचा आज 137 वा वर्धापनदिन असून त्यानिमित्त दिल्लीतील मुख्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Congress party flag fell off while hoisting.

Congress party flag fell off while hoisting.

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचा (Congress) आज 137 वा वर्धापनदिन. त्यानिमित्त दिल्लीतील मुख्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम (Congress Flag Hosting Ceremony) आयोजित करण्यात आला आहे. पण कार्यक्रमातच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीतच विघ्न आलं. त्या ध्वजारोहण करत असतानाच ध्वजस्तंबावरून ध्वज खाली पडला. याचवेळी सोनिया गांधी यांनी प्रसंगावधान राखत ध्वज हातात झेलला. सोनिया गांधी यांनी ध्वज खाली न पडू देता ध्वजाचा मान राखला.

देशभरात काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्धापनदिन साजरा केला जात आहे. मुख्य कार्यक्रमाचे दिल्लीतील मुख्यालयात आयोजन करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यासह पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी नियोजनानुसार सोनिया गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार होते. त्यांच्याकडून ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच ध्वजस्तंभावरून झेंडा खाली पडू लागला.

<div class="paragraphs"><p>Congress party flag fell off while hoisting.</p></div>
राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर; राजकीय घडामोडींना वेग

सोनिया गांधी यांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी प्रसंगावधान राखत झेंडा हातात झेलला. ध्जजस्तंभावरील दोरीला झेंडा योग्य प्रकारे बांधला न गेल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या प्रकारानंतर सोनिया गांधी व इतरांनी झेंडा हातात धरून फडकावत त्याचा मान राखला गेला.

त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) व सरचिटणीस प्रियांका गांधींनीही (Priyanka Gandhi) कार्यकर्त्यांना ध्जव फडकावण्यास सांगितले होते. पण त्यानंतर दोघा-तिघांनी प्रयत्न करूनही ते शक्य झाले नाही. झेंडा फडकवण्यासाठी शिडीही मागवण्यात आली होती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावरून काही नेटकऱ्यांकडून काँग्रेसला टोलाही लगावला जात आहे. तसेच काहींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा ध्वजारोहणाचा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com