राजकारण तापलं; पृथ्वीराज चव्हाणांसह नाराज नेत्यांनी ऐनवेळी बदललं बैठकीचं ठिकाण

काँग्रेसमधील नाराज गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जी 23' मधील काही नेत्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे.
G 23 Leaders
G 23 LeadersSarkarnama

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसमधील नाराज गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जी 23' (G 23) मधील काही नेत्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. त्यातच आता हे नेते आज दिल्लीत एकत्रित येत असल्याने काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जी 23 मधील बहुतेक नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या घरी एकत्रित आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह कपिल सिब्बल (Kapil Sibal), आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शशी थरूर, राज बब्बर, कुलदीप शर्मा आदी नेत्यांचा समावेश आहे. सुरूवातीला हे नेते सिब्बल यांच्या घरी भेटण्याचे ठरले होते. पण ऐनवेळी हे ठिकाण बदलण्यात आले. त्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

G 23 Leaders
रजनी पाटील यांनी उपराष्ट्रपतींचं मन जिंकलं अन् सभागृह दणाणलं!

सिब्बल यांच्या घरी न जाण्यामागचे कारण समोर आलं आहे. सिब्बल यांनी नुकतेच गांधी कुटुंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष नसले तरी तेच निर्णय घेत आहेत, असंही सिब्बल म्हणाले होते. गांधी कुटुंबाबाहेरील नेतृत्व हवे, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आपलंही समर्थन आहे, असा संदेश पक्षात जायला नको, या उद्देशाने सिब्बल यांच्या घराऐवजी आझाद यांच्या घराला पसंती दिल्याची सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हे नेते दुसऱ्यांदा एकत्रित येत आहेत. याआधी 11 मार्च रोजी आझाद यांच्याच घरी बैठक झाली होती. याच बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुकुल वासनिक यांच्या नावाबाबत आग्रह धरण्यात आला होता. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची भूमिका घेतल्याची चर्चाही होती. पण नंतर त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न नसल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं होतं.

काय म्हणाले होते सिब्बल?

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. त्याचा मला आधीच अंदाज होता. पण 2014पासून कॉंग्रेसची सातत्याने घसरण होत आहे. आम्ही एकापाठोपाठ एक राज्य गमावत चाललो आहोत. ज्या राज्यात आम्हाला यश मिळत होतं, तिथलेही कार्यकर्तेही कॉंग्रेस सोडून जात आहेत. आता कॉंग्रेस एका कुटुंबाऐवजी सर्वांचीच होण्याची गरज आहे. या काळात काँग्रेसचे प्रमुख नेते गायब झाले. 2014 नंतर आतापर्यंत 177 खासदार, आमदारांसह आणि सुमारे 222 उमेदवारांनी काँग्रेस सोडून गेले आहेत. जे नेतृत्व करू शकत होते तेही काँग्रेस सोडून गेले. 2022च्या विधानसभा निवडणुकीतही नेतृत्व करू शकणाऱ्या नेत्यांनीही कॉंग्रेस सोडली. कोणत्याही राजकीय पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणवर नेते सोडून गेल्याचं मी कधीच पाहिलं नाही, असं कपिल सिब्बल मंगळवारी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com