Rahul Gandhi : राहुल गांधींवर काँग्रेस पाठोपाठ 'इंडिया'चा दबाव, मोठा निर्णय घेणार?

Congress Rahul Gandi India Alliance : भाजप सरकार नव्हे तर एनडीए सरकार सत्तेत असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. मात्र, लोकसभेत कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले विरोधी पक्षनेते पद काँग्रेस कोणाला देणार हे अजुनही स्पष्ट झाले नाही.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama

Rahul Gandhi News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 100 जागांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे. काँग्रेसकडून अजुनही विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचे नाव समोर आले नाही. मात्र, राहुल गांधींनी हे पद स्वीकारावे, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. काँग्रेस पाठोपाठ इंडिया आघाडीतील पक्षांनी देखील राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राहुल गांधींनी अजुनही ते विरोधी पक्षनेते पद स्वीकारणार की नाही, हे स्पष्ट केले नाही. मात्र, त्यांनीच हे पद स्वीकारावे म्हणून काँग्रेस समोर इंडिया आघाडीतून त्यांच्यावर दबाव वाढतो आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला 242 जागांवर रोखण्यात काँग्रेसला Congress यश आले आहे. भाजप सरकार नव्हे तर एनडीए सरकार सत्तेत असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. मात्र, लोकसभेत कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले विरोधी पक्षनेते पद काँग्रेस कोणाला देणार हे अजुनही स्पष्ट झाले नाही.

Rahul Gandhi
Lok Sabha Speaker Election : मोदी सरकारची पहिली परीक्षा 26 जूनला; किंगमेकरमध्येच मतभेदाची ठिणगी...

2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खालवली होती. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देखील लोकसभेत मिळाले नव्हते. दहा वर्षानंतर काँग्रेसचे 100 खासदार विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदा त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राहुल गांधींनी मंत्रिपद स्वीकारले नव्हते

युपीए सरकारच्या काळात राहुल गांधी Rahul Gandhi हे खासदार म्हणून लोकसभेत होते. मात्र, मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नव्हता. राहुल गांधी यांनीच मंत्रिमंडळात सहभागाला नकार दिला होता. त्यामुळे या वेळी देखील राहुल गांधी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काम करणार की विरोधी पक्षनेते पद स्वीकारणार या विषयी संभ्रम कायम आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi on EVM : EVM जिवंतच! भारतच नव्हे अमेरिकेतही ‘दाल में कुछ काला है’…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com