Lok Sabha Speaker Election : मोदी सरकारची पहिली परीक्षा 26 जूनला; किंगमेकरमध्येच मतभेदाची ठिणगी...

NDA Government Modi Government Chandrababu Naidu Nitish Kumar : लोकसभा अध्यक्षपदावरून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याच पक्षामध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nitish Kumar Narendra Modi Chandrababu Naidu
Nitish Kumar Narendra Modi Chandrababu NaiduSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मोदी सरकारची पहिल्या सत्वपरीक्षेची तारीख ठरली आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जूनला असून त्यावरून सरकारचे किंगमेकर असलेल्या संयुक्त जनता दल आणि तेलुगू देसम पक्षामधील मतभेद उघड झाले आहेत. टीडीपीला अध्यक्षपद आपल्याकडे हवे असल्याची चर्चा आहे.

मागील दोन्ही टर्ममध्ये भाजपने अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवले होते. पण तिसऱ्या टर्मध्ये भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकले नाही. सरकारला जेडीयू आणि टीडीपीच्या टेकूवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याची झलक खातेवाटपातही दिसून आली.

Nitish Kumar Narendra Modi Chandrababu Naidu
Rahul Gandhi on EVM : EVM जिवंतच! भारतच नव्हे अमेरिकेतही ‘दाल में कुछ काला है’…

लोकसभा अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचे पद आहे. त्यामुळे हे पद भाजप आपल्याकडेच ठेऊन घेण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी जेडीयूचाही भाजपला पाठिंबा आहे. पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. पण टीडीपीची त्याबाबतची भूमिका वेगळी आहे. 

एनडीएच्या बैठकीतच अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला जावा. बैठकीत सर्व सहकाऱ्यांच्या संमतीने नाव ठरवल्यानंतर टीडीपी त्याचे समर्थन करेल, असे या पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. या बैठकीत टीडीपीकडून आपल्याकडे अध्यक्षपद द्यावे, याची मागणी केली जाऊ शकते. तसेच झाल्यास भाजपकडून वेगळा फॉर्म्यूला निश्चित केला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.    

Nitish Kumar Narendra Modi Chandrababu Naidu
Suresh Gopi on Indira Gandhi : मोदी सरकारमधील मंत्री सुरेश गोपी म्हणतात, इंदिरा गांधी तर 'Mother of INDIA'

एनडीएला अध्यक्षपदाचे नाव 25 तारखेला सकाळपर्यंत निश्चित करावे लागेल. दुपारपर्यंत अर्ज भरावा लागणार आहे. विरोधकांनीही उमेदवार दिल्यास 26 तारखेला निवडणूक होईल. निवडणूक बिनविरोध करायची असल्यास लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावी, अशी मागणीही पुढे आल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे संजय राऊत यांनीही डाव टाकला आहे. टीडीपीने आपला उमेदवार अध्यक्षपदासाठी दिल्यास इंडिया आघाडीकडून या उमेदवाराला पाठिंबा दिला जाऊ शकतो, असे राऊतांनी म्हटले आहे. त्यामुळे इंडियाकडून पुन्हा एकदा चंद्राबाबू नायडूंना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी 25 आणि 26 जून या तारखा महत्वाच्या ठरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com